-मोशीतील मेळाव्यात अजित पवारांचा गौप्यस्फोट

– लोकसभा निवडणूक देशाची; विकासाची दृष्टी असणारा माणूस संसदेत पाठवा

पिंपरी 29 एप्रिल : पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या बाबत मोशी येथे केला.

महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोशी येथील गणेश बँक्वेट हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष शाम लांडे, फजल शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, वसंत बोराटे, संगीता ताम्हाणे, विनया तापकीर, प्रवीण भालेकर, समीर मासुळकर, प्रकाश सोमवंशी, विजय लोखंडे, प्रदीप तापकीर, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विशाल काळभोर, नारायण बहिरवाडे, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, मंदा आल्हाट, चंद्रकांत वाळके, धनंजय भालेकर, संजय औसरमल, अतिश बारणे, गंगा धेंडे, विकास साने, गणेश सस्ते, स्वयंरोजगार सेल महिला प्रदेशाध्यक्ष मेघा पवार, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, दीपक साकोरे, अपूर्व आढळराव पाटील, सारिका पवार, विराज लांडे, ज्योती गोफणे, मारूती शिंदे, मनीषा गटकळ, श्रीकांत कदम, सचिन औटे, युवराज पवार, प्रदीप आवटे, पुनम वाघ, उत्तम आल्हाट, सोमनाथ मोरे, शशीकिरण गवळी, प्रसाद कोलते, शरद भालेकर, सागर बोराटे, धनाजी खाडे, रवींद्र सोनवणे, तानाजी खाडे, विशाल आहेर, विनोद वरखडे तसेच इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले लोकसभा निवडणुक ही देशाची निवडणूक आहे. ती गावकी भावकीची निवडणूक नाही. मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी आपण अशाच प्रकारचे मेळावे घेतले होते. सभा घेतल्या. त्यांना निवडून आणण्यासाठी आपण झटलो. त्यांना निवडून देखील आणले. मात्र निवडून आल्यानंतर दीड दोन वर्षातच कोरोनाचे संकट आले. ज्यांना आपण निवडून आणले ते माझ्याकडे राजीनामा घेऊन आले होते. त्यांना मी विचारले की तुम्हाला कशासाठी राजीनामा द्यायचा आहे. असे करू नका.

आढळरावांकडे विकासाची दृष्टी

लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे . या निवडणुकीतून येणारा निकाल आपले भविष्य ठरवत असतो. विकासात्मक पातळीवर देशाला पुढे नेण्याचे काम लोकसभेच्या निवडणुकीतून आपल्याला करायचे आहे. त्यासाठी विकासाची दृष्टी असणारा ताकतीचा नेता आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला संसदेत पाठवायचा आहे. शिरूर मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील हे विकासाचे व्हिजन ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचे काम आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करायचे आहे असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *