निगडी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी निगडी प्राधिकरण येथील अप्पूघर येथील दुर्गा टेकडीवर ‘मॉर्निंग वॉक’साठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे “मशाल” चिन्हाचे बटण दाबून मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले.
या वेळी शिवसेना पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, प्रचारप्रमुख योगेश बाबर, उपशहरप्रमुख अमोल निकम, वैभवी घोडके, संजय दुर्गुळे, निखिल दळवी, अमोल भोईटे, अभिजीत सोनके, विकास भिसे, बापू फाटांगरे, राजू जगदाळे,लाला लाहोटी, तेजस पवार, महेश पानसकर यांच्यासह महाआघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सकाळी व्यायाम करणारे युवा तरुण, हास्ययोग आणि योगा ग्रुप यांच्याशी संपर्क साधून शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे पदाधिकाऱ्यांनिही मतदारांशी संपर्क साधला. या वेळी मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मॉर्निंग वॉक करताना नागरिकांच्या समस्याबाबत चर्चा केली. व त्या समस्या सोडवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले. गेल्या दहा वर्षात मतदार राज्याची सरकारने आश्वासनांचे गाजर दाखवून निव्वळ फसवणूकच केली आहे. मी मावळ लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच वाघेरे पाटील यांनी सर्व स्तरातील लोकांच्या भेटी घेत “मशाल” चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन या वेळी केले.