पिंपरी :- भोसरी विधानसभाचे दमदार आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.नगरसेवक मा शांताराम बाप्पू भालेकर यांनी त्रिवेणीनगर – तळवडे रोडच्या ट्रॅफिक समस्या संदर्भात पालिकेचे अधिकारी व आर टी ओ प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री निलेश नलावडे, कनिष्ठ अभियंता गौरव शिंदे, स्थापत्य विभागाचे राजू कुंभार, नगररचना विभागाचे अनिल इदे साहेब व सर्व्हेअर गवळी साहेब यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.
त्यावेळी मा.सभापती धनंजय भालेकर, ज्योतिबानगर इंडस्ट्रीअल असोसिएशनचे अध्यक्ष टिकाराम शर्मा, सेक्रेटरी कीर्ती शहा, अनिल वाचपेयी, राजेंश शर्मा, राकेश पारेख, सत्यन देशमुख व अनेक उद्योजक उपस्थित होते. तसेच तळवडे ट्रॅफिक पी.आय. डाॅ.अमरनाथ वाघमोडे व महापालिकेच्या अधिकारी वर्गाने ट्रॅफिक संदर्भातील समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
