पिंपरी : महापालिकेच्या केशवनगर येथील माध्यमिक विद्यालय आणि भागशाळा रावेत यांच्या वतीने इयत्ता ९ वी मध्ये शिकणाऱ्या साहिल कांबळे याने रेखाटलेल्या निसर्ग चित्रांचे भव्य प्रदर्शन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे २० ते २२ जुलै यादरम्यान भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनाला माजी नगरसदस्य सुरेश भोईर, माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे तसेच केशवनगर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास चपटे, रामेश्वर पवार, विविध विषयांचे शिक्षक, कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *