चिंचवड :- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आकस्मात निधन झाल्यामुळे आगामी दीड वर्षाकरीता पोट निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणूकीत प्रमुख दावेदार लक्ष्मण जगताप याचे कुटुंबिय त्यांची पत्नी अश्विनी जगताप व भाऊ शंकर जगताप हे आहेत. भाजपाने जागा कायम ठेवण्याचा चंग बांधला आहे राष्ट्रवादीने प्रचार सुरु केला असून सर्व पूर्णतयारीत उत्तरले आहेत. मागची निवडणूक काँग्रेस- राष्ट्रवादी युतीतून कैलास कदम लढल्यामुळे ते देखील हक्क सांगत आहेत.
काल 26 जानेवारी कोकण वासीयांचा मेळावा थेरगाव येथे संपन्न झाला. या मेळावा प्रसंगी सर्व कोकण वासीयांनी रामकृष्ण राणे यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. चिंचवड मतदार संघात साधारण ६५ से ७० हजार कोकणी मतदान आहे. राणे यांनी महासंघाचे सेक्रेटरी पदी काम करून कोकणवासीयांना आपलेसे केले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे राणे हे भाजपाचे जेष्ठ कार्यकतेँ असून आमदार लक्ष्मण जगताप यांचे स्विय सहाय्यक म्हणून काम केले आहे.
लवकरच राणे त्यांच्या सहकार्यांसहीत भाजपा प्रदेशाध्यक्ष- चंद्रशेखर बावणकुळे, उपमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री- चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेणार आहेत. भारतीय जनता पाटीँच्या जुन्या कार्यकर्त्यांचे राणे यांना समर्थन असून मोठा पाठींबा मिळत आहे. राणे यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपा चिंचवड ची जागा राखण्यास यशस्वी होणार हे नक्की.
यावेळी राणे यांनी असे सांगितले की, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी नाही मिळाली तर मी निवडणूक लढणार असे ही सांगीतले आहे.