दापोडी :- आनंदवन काटेवस्ती दापोडी येथे पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय पुणे व गोदाई महिला कुष्ठपिडीत व स्वयंरोजगार संस्था दापोडी यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील दुर्लक्षीत घटकासाठी युवक व युवती नेतृत्वगुण विकास प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी सर्वशिक्षा अभियान सदस्य विक्रम नाणेकर यांनी विषेश प्रशिक्षण दिले. संस्थेचे संस्थापक सचिव योगीता नाणेकर यांनी प्रास्तावीक केले. या कार्यक्रमासाठी परीसरातील 32 महिलानी प्रशिक्षण घेतले असून बहुसंखेने महिलांनी प्रतीसाद दिला या ठीकाणी सौ. सुरेखा भांबुरे, आशा गाडगे, शिमा सुर्यवंशी, मिरा म्हस्के, कल्पना बनसोडे, अंबीका चिकले, काजल यादव, लक्ष्मी बंगारी, शारदा शर्मा, अबीका यादव, सुभद्रा सांळुके, सुलाबाई कांबळे, लक्ष्मी पुजारी, फातीमा शेख, निर्मला नाउमणी, निजांबी शेख, अषाताई कानडे, रेश्मा शेख, जया ननावरे, प्रिती गवळी, प्रणीत बनसोडे, सावीत्री कोळी, शितल गावडे, स्नेहल कांबळे, मिनाक्षी कांबळे, आराध्या सुर्यवंशी, रखमाई कदम, रुपाली सांळुंके, रतन अडसूले, राणी कसबे, आमपाली शिंदे, राजश्री शिंदे या उपस्थित होत्या तसेह संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनिता गावडे यांनी आभार मानले.
