पिंपरी : “वंचित घटकासाठी ज्ञानदीप उजळणे म्हणजेच ख-या अर्थाने दिवाळीचा दीपोत्सव असतो. समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश उजळण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील व्हावे” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मा.अशोक कोठारी यांनी केले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित “दिवाळीसांज” या कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. आकुर्डी येथील बीना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वसुबारसेच्या निमित्ताने सवत्स धेनू प्रतिमेचे पूजन करून आणि पणत्या उजळून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. बीना इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक मा. अब्दुल्ला खान यांची प्रमुख पाहुणे म्हणून ,तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील ,ज्येष्ठ साहित्यिक मा. राजेंद्र घावटे, माजी प्राचार्य मा. परशराम शिंदे यांची व्यासपीठावर सन्माननीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपतराव शिंदे यांनी केले. यानिमित्ताने स्वरचित भक्ती कविता आणि भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
ज्येष्ठ साहित्यिक माधुरी ओक यांनी नवचैतन्य भजन मंडळासमवेत भारुडाचे अप्रतिम सादरीकरण केले. शोभाताई जोशी, कैलास भैरट, चंद्रकांत धस,सविता इंगळे ,वर्षा बालगोपाल, बाबू डिसूजा, सुभाष चव्हाण, जयश्री श्रीखंडे,शामला पंडित , प्रा. नरहरी वाघ, मनीषा पाटील, आनंदराव मुळुक,कांचन नेवे, रेखा कुलकर्णी , शामराव सरकाळे,आत्माराम हारे, सुप्रिया लिमये,नीता खरे, क्षमा काळे, कैलास सराफ, जितेंद्र राय, सुभाष चटणे, रामदास हिंगे, अरुण कांबळे, अशोक सोनवणे,योगिता कोठेकर, प्रतिमा काळे, रत्नमाला सोनवणे, चि.अन्वेष देशपांडे यांनी भक्तीरचना सादर करून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. पणत्यांच्या प्रकाशात श्लोक,अभंग, भजन , गवळण ,भारुड ,फटका अशा विविध भक्तीरंगात न्हाऊन रसिक तृप्त झाले. कार्यक्रमाचा समारोप दिवाळीच्या फराळाने करण्यात आला.
याप्रसंगी श्रीकांत चौगुले, रघुनाथ पाटील,प्रकाश ननावरे आणि विविध मान्यवर साहित्यिक तसेच साहित्य रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी विधाटे यांनी व आभार प्रदर्शन अनिकेत गुहे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन राज अहेरराव, नंदकुमार मुरडे, अश्विनी कुलकर्णी, अरविंद वाडकर , शरद काणेकर, उज्ज्वला केळकर, चिंतामणी कुलकर्णी यांनी केले.
