पिंपरी, दि.१९ : – दापोडी येथील एका महिलेचा मृतदेह शिवविच्छेदन करताना बदलला. यावरून मयत महिलेच्या नातेवाईकांनी वायसीएम हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत डीन कार्यालयात तोडफोड करत गोंधळ घातला.  संतप्त नातेवाईकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अधिकची कुमक आल्याने वायसीएम परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्नेहलता अशोक गायकवाड (वय ५७, रा. दापोडी) हे महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी अंगावर भिंत कोसळल्याने ती महिला गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला औंध येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथून त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी गायकवाड यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आले होते.

मृतदेहाचे मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. बुधवारी मध्यरात्री शवविच्छेदनगृहात तीन महिलांचे मृतदेह होते. पहाटे तीन वाजताच्या सुमारास स्नेहलता यांच्या नातेवाईकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले त्यांचे गुजरात येथून नातेवाईक येण्याचे येत असल्याने त्यांच्यावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे स्नेहलता यांचे नातेवाईक बुधवारी सकाळी सात वाजता पुन्हा त्यांची पाहणी करून गेले. त्यावेळी देखील स्नेहलता यांचा मृतदेह शवविच्छेदनगृहात होता मात्र अकरा वाजताच्या सुमारास त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले. मृत्यू गाडीमधून घेऊन जात असताना तो मृतदेह स्नेहलता यांचा नाही हे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी शुभविच्छेदनगृहात जाऊन पाहणी केली असता स्नेहलता यांचा मृतदेह तिथं नसल्याचे उघड झाले.

त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी वायसीएम रुग्णालयात गोंधळ घातला नातेवाईकांनी डॉ. वाबळे यांचे कार्यालयाची तोडफोड केली. संतप्त नातेवाईकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अधिकची कुमक मागविली त्यावेळी वायसीएम परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. स्नेहलता यांचे नातेवाईक सकाळी 11 वाजता येण्यापूर्वी दोन मृतदेह देण्यात आले आहेत. त्या दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे स्नेहलता यांचा मृतदेह कुठे गेला याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *