पिंपरी :- महानगरपालिकेच्या विविध विभागात वर्षानुवर्षे उत्तम सेवा करून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा महापालिकेस सार्थ अभिमान वाटत असून त्यांच्या कामगिरीमुळे पालिकेच्या लौकीकात भर पडली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑगस्ट २०२२ अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या एकूण ३० अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सेवानिवृत्ती कार्यक्रमास उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, लेखाधिकारी वसंत उगले, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कामगार महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे ऑगस्ट २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांमध्ये सहा. आयुक्त दिलीप बबन आढारी, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) सुनिल वाघुंडे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रदीप बाराथे, कार्यालयीन अधिक्षक रामकृष्ण अघाव, मुख्य लिपिक राजेश जाधव, नेत्र चिकित्सा अधिकारी अरुणा पवार, निदेशक अरविंद वोनकर, उपशिक्षिका उषा चौधरी, शोभा गोडसे, वाहन चालक बबन सातपुते, रखवालदार विठ्ठल कळमकर, शिपाई चिंधू नढे, मजूर काशिनाथ कवडे, यशवंत नानेकर, चंद्रकांत कसबे, रामचंद्र जगताप, काशिनाथ मांडेकर, अशोक तेलंगे, युवराज नेवाळे, श्याम वाळुंजकर, आया ज्योती ढेकणे यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती घेणा-या कर्मचा-यांमध्ये प्रशासन अधिकारी राजेश ठाकर, असिस्टंट मेट्रन प्रभा दुर्गे, सुजाता गोरे, मुकादम दिलीप साठे, सफाई कामगार कल्याण बोती सुरेश, सफाई सेवक ललीता चव्हाण, रेखा गोहर, राजू गाडेकर, कचराकुली शिवाजी क्षिरसागर यांचा समावेश आहे.