पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगररचना सरव्हेअर अधिकारी संदिप लबडे यांनी आजपर्यंत खुप भ्रष्ट्राचार केला आहे. त्यामुळेच लाचलुचपत विभाग अॅण्टी करपशन यांनी त्यांना पकडले आहे. तरी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील नगरविकास अधिकारी लबडे यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे मा.विभाग प्रमुख तारामण कलाटे यांनी आयुक्त यांच्याकडे केली.
संदिप लबडे यांनी वाकड परिसरात देखील मोठया प्रमाणावर बेकायदेशी कामे करून भष्ट्राचार केला आहे. संदिप लबडे यांनी कामामध्ये केलेल्या भ्रष्ट्राचाराची माहिती पुढील प्रमाणे आहे.
१) वाकड येथील स.नं. १७६ चौधरी पार्क मधील १८ मिटर रस्त्याची चुकीची मार्किंग करून भ्रष्ट्राचार करून सुयोग बिल्डर यांस प्लॅन पास करून देण्यात आला आहे.
२) वाकड चौकात मंदिराच्या जागेत चुकीची मार्किंग केली आहे. त्यामध्येही भ्रष्ट्राचार केला आहे.
३) दत्त मंदिर रोडवर ४५ मीटर डिपी असताना विलास जावडेकर या बिल्डरला ३० मीटरवर प्लॅन पास करून दिलेला आहे. त्यामध्ये भ्रष्ट्राचार झालेला दिसून येत आहे.
सदरील भ्रष्ट्राचाराची पाळेमुळे शोधावी. वरील संदर्भात वेळोवेळी नागरिकांच्या सहया घेऊन अर्ज दिलेले आहेत. सर्व प्रकरणे बाहेर काढावीत व नागरिकांना मुळ भाग नकाशा प्रमाणे मार्किंग करून मिळावी अशी विनंती पत्रात केली आहे. लबडेवर वाकड परिसरातील बेकायदेशीर कामाबद्दल कारवाई झाली नाही तर नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा तारामण कलाटे यांनी केली.