यात २४ पत्राशेड, ३ वीट बांधकाम व पत्रा बांधकाम अशी एकुण २७ बांधकामे अंदाजे १९८६.०० चौ.मी. (२१३७०.०० चौ.फुट) अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.
या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी, ब प्रभागातील धडक कारवाई पथकातील कनिष्ठ अभियंता, मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच १४ मनपा पोलिस कर्मचारी व महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल २४ कर्मचारी सहभागी झाले होते. ही कारवाई २ जेसीबी तसेच १५ मजुरांमार्फत करण्यात आली.