शब्दधन काव्यमंच व मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी  कविसंमेलनात सहभागी होण्याचे आवाहन…

पिंपळे गुरव –पिंपरी चिंचवड शहरात स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त  अवघ्या ७५ तासात  तयार झालेल्या ८ ते ८० उद्यान, सुदर्शन चौक, पिंपळे गुरव येथे रविवारी दिनांक २८ ऑगस्ट  रोजी दुपारी १.३० वा. “जागर स्वातंत्र्याचा”   कवीसंमेलन होणार आहे. आतापर्यंत ९० कवींनी सहभाग नोंदवला आहे, कवी संमेलनाचे उदघाटन  माजी नौदल सेना अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या हस्ते तिरंगापूजनाने होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ.मुं. शिंदे आणि त्यांच्या पत्नी कवयित्री लीला शिंदे असणार आहेत. योगायोग म्हणजे फ. मुं. शिंदे यांचा आयुष्याचा अमृतमहोत्सव याच वर्षी आहे. त्यांचा दोन्ही संस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करणार आहोत.  यावेळी सहभागी कवींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त कवींनी, गझलकारांनी, साहित्यिकांनी या ऐतिहासिक अमृतमहोत्सवी कवी संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सुरेश कंक, आण्णा जोगदंड, विकास कुचेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *