पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी | दि.७ :- येणाऱ्या काळात लवकरच पिंपरी चिंचवड शहरात भव्य दिव्य असं मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पत्रकारांच्या व्यवस्थेसाठी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने महापालिकेच्या कामगार भवनांची पाहणी आज(दि.७) अध्यक्ष अनिलजी वडघुले, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
अधिवेशनाला राज्यभरातून दोन ते तीन हजार पत्रकार येत असतात. त्यासाठी अधिवेशनाला मोठे आणि सुसज्ज अश्या महत्त्वाच्या ठिकाणाची गरज असते त्या दृष्टीने कामगार भवन हे सोयीचं आहे. या ठिकाणीच अधिवेशन होईल अशी शक्यता आहे. पत्रकारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतल्या जाईल असे मत ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे यांनी व्यक्त केले.
महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंझुर्डे म्हणाले की, पत्रकार हे शहराचे महत्वाचे अंग आहे. शहारातील चांगल्या व वाईट बातम्या देउन लक्ष ठेवण्याचे काम करत असतात.अधिवेशनासाठी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाला कामगार भवन देऊ असे आश्वासीत करतो.
या वेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, सोशल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे, महीला अध्यक्ष शबनम सय्यद, सरचिटणीस प्रवीण शिर्के, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अनिल भालेराव, रेहान सय्यद, विश्वजित पाटील, संजय कुटे इत्यादि उपस्थित होते.