पिंपरी (दिनांक : २० जुलै २०२२):- नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाने विनाशुल्क श्रावणी काव्यस्पर्धेचे आयोजन केले आहे. काव्यस्पर्धेचे हे एकोणतिसावे वर्ष आहे. सदर स्पर्धा काव्यलेखन आणि सादरीकरण या दोन स्तरांवर घेण्यात येते. कवितेसाठी विषयाचे बंधन नाही. कविता किमान बारा आणि कमाल वीस ओळींपर्यंत असावी. ‘श्रावणी काव्यस्पर्धेसाठी’ असा उल्लेख करून कवितेचे शीर्षक, कविता, कवीचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहावा. कविता राजकीय, सामाजिक, धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण करणारी नसावी. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. काव्यस्पर्धा शनिवार, दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी तीन वाजता पिंपरी-चिंचवड परिसरात आयोजित केली जाणार आहे. काव्यलेखन आणि सादरीकरण यांचे गुण एकत्रित करून विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. कविता पाठविण्याची अंतिम मुदत बुधवार, दिनांक २७ जुलै २०२२ आहे. फक्त व्हॉट्सॲपवर टाईप केलेल्या कविता माधुरी विधाटे (भ्रमणध्वनी क्रमांक ७५८८३२८४६९) यांच्याकडे पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी राजेंद्र घावटे (भ्रमणध्वनी क्रमांक ८८८८४३४३३१) किंवा अश्विनी कुलकर्णी (भ्रमणध्वनी क्रमांक ९३०९७७०८९८) यांच्याशी संपर्क साधावा.