पिंपरी :- आकुर्डी-देहू येथील संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी मध्ये पिंपरी चिंचवड येथील सर्व साहित्यिकांनी सहभाग नोंदवला गौळणी,अभंग गात वारीत सहभागी झाले होते .सर्व ठिकाणी मध्ये मध्येच रस्त्यात थांबून गोल रिंगण करून पुरुषांनी व महिलांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला .विशेष म्हणजे 80 वर्षाच्या शोभाताई जोशी यांनी फुगडी खेळून एक आदर्श निर्माण केला.
स्वच्छतेने करू, भारत मातेचे रक्षण…
प्लास्टिक मुक्ती व पर्यावरणाचे रक्षण अशा प्रकारचे अनेक जनजागृतीचे फलक साहित्यिकानी हातात घेतले होते.
अण्णा जोगदंड यांनी आपल्या अंगावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज,जगद्गुरु ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, संत जनाबाई यांचे छायाचित्र चिटकून ड्रेस परिधान करुन “साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा “ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।। असे लिहिलेले होते तर प्रकाश घोरपडे यांनी संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा धारण करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.आबालवृद्ध माऊली ,माऊली म्हणत भक्ती भावाने त्यांना नमस्कार करून आर्शिवाद घेत होती.
या साहित्य दिंडीत प्रकाश घोरपडे, अण्णा जोगदंड, मुरलीधर दळवी ,शामराव सरकाळे, कैलास भैरट ह.भ. प.अशोक महाराज गोरे, फुलवती जगताप, शोभाताई जोशी ,अरुण कांबळे, श्यामला पंडित, सविता इंगळे, हेमंत जोशी,निवेदक श्रीकांत चौगुले, तानाजी एकोंडे,धनश्री चौगुले, योगिता कोठेकर, मल्लिकार्जुन इंगळे ,ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांच्या सह अनेक साहित्यिक उपस्थित होते.
साहित्य दिंडीचे नियोजन इथे कोणीच केले नव्हते तर स्वयंस्फूर्तीने शहरातील साहित्यिक सहभागी झाले होते. सर्व साहित्यिकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल सुभाष चव्हाण यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यापुढील वर्षीही पिंपरी चिंचवडकर वारीत येण्याचा निर्धार साहित्यिकांनी व्यक्त केला.
