पिंंपरी :- देहू येथील संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी मध्ये पिंपरी चिंचवड येथील सर्व साहित्यिकांनी सहभाग नोंदवला गौळणी, अभंग गात वारीत सहभागी झाले होते .सर्व ठिकाणी मधे मध्येच रस्त्यात गोल रिंगण करून पुरुषांनी व महिलांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे 80 वर्षाच्या शोभाताई जोशी यांनी फुगडी खेळून एक आदर्श निर्माण केला.

स्वच्छतेने करू, भारत मातेचे रक्षण. प्लास्टिक मुक्ती व पर्यावरणाचे रक्षण अशा प्रकारचे अनेक जनजागृतीचे फलक साहित्यिकानी हातात घेतले होते. अण्णा जोगदंड यांनी आपल्या अंगावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज,जगद्गुरु ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, संत जनाबाई यांचे छायाचित्र चिटकून ड्रेस परिधान करुन “साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा “ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान असे लिहिलेले होते तर प्रकाश घोरपडे यांनी संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा धारण करून भावीकाचे लक्ष वेधित होते.

यांनी यावेळी साहित्य दिंडीत प्रकाश घोरपडे, अण्णा जोगदंड, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, कैलास भैरट ह.भ. प.अशोक महाराज गोरे, फुलवती जगताप, शोभाताई जोशी, अरुण कांबळे, श्यामला पंडित, सविता इंगळे, हेमंत जोशी, निवेदक श्रीकांत चौगुले, तानाजी एकोंडे, धनश्री चौगुले, योगिता कोठेकर, मल्लिकार्जुन इंगळे यांच्या सह अनेक साहित्यिक उपस्थित होते.

साहित्य दिंडीचे आयोजन सुरेश कंक व पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले,तर सहभागी सर्व साहित्यिकांचे आभार सुभाष चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *