पिंपरी :- राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या महाकाव्य स्पर्धेत कवी,लेखक तानाजी एकोंडे यांना “राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्कार” प्राप्त झाला.राळेगण सिद्धी येथे राष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन अधिवेशनात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आण्णा हजारे यांनी सर्व पुरस्कारर्थिचे कौतुक करून पर्यावरण वाचवण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन स्वतः झोकून देऊन काम करण्याचा सल्ला दिला.
गुणवंत कामगार एकोंडे यांच्या नावे प्रकाशित दोन पुस्तके व संपादित दोन पुस्तके आहेत. १९९२ मध्ये जपानमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी जापनीज संस्कृतीचा सखोल अभ्यास केला असून त्या संदर्भातील त्यांचे “उगवत्या सूर्याचा देश- जपान” हे पुस्तक नावारूपास आले. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. विशेषतः पर्यावरणविषयक भित्तीचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करणे व वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे आदी उपक्रम ते सातत्याने राबवित असतात. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल व साहित्यिक निर्मितीबद्धल त्यांना आतापर्यंत गदिमा साहित्य पुरस्कार, सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार, डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार,श्रमगौरव आदी अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळालेले आहेत. आगामी काळात त्यांचे अष्टाक्षरी,शामलाक्षरी,हायकू, काव्यांजली आणि मुक्तछंदातील दोन काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
यावेळी जेष्ट समाजसेवक आण्णा हजारे, संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे, सचिव दिपक काळे, ह.भ.प पुरुषोत्तम हिंगणकर महाराज यांच्या सह अनेक संस्थाचे पदाधिकारी व पर्यावरण प्रजमी उपस्थित होते.
