पिंपरी :- कामगार आणि मालक यांचेमधील समानताच देश घडवु शकेल ,कामगारांंकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा कनिष्ठ नसावा,कामामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ हा भेदभाव नसतो. ते कामच त्याचे श्रेष्ठत्व दर्शवत असते.आपल्या देशामध्ये श्रमाला प्रतिष्ठा नाही.अमेरिका सारख्या देशात पूर्ण अँटो मायझेशन झालेले असल्यामुळे तेथे श्रमाला महत्व आणि किंमत ही जास्त आहे आपल्याकडे श्रमाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे आहे.

गुणवंत कामगार कल्याण मंडळाने आपल्या उपक्रमात असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही सामावून घ्यावे व आपल्या उपक्रमाचा लाभ त्यांनाही मिळवुन द्यावा.संघटित कामगारापेक्षा असंघटित कामगारांची संख्या अधिक आहे.तथापि,ते शासकीय योजनांपासून वंचित राहू नयेत.त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे.गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून त्याचा सतत पाठपुरावा करावा.
असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील माजी कुलगुरू व महाराष्ट्र शासनाचे माजी उच्च शिक्षण संचालक मा.श्री एस एन पठाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले चिंचवड येथील गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय गुणवंत कामगार स्नेह मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
गुणवंत कामगार कल्याण मंडळाचा कामगार स्नेह मेळावा व “गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर कामगारांची भूमिका” या विषयावरील परिसंवाद चिंचवड येथील अँटो क्लस्टर येथे ऊत्साहाच्या वातावरणात पार पडला.डॉ.पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय अधिकारी सतीश मोटे,विभागीय कामगार आयुक्त दत्तात्रय गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्याचबरोबर थायसन कृप इंडस्ट्रीजचे माजी संचालक मान. आर एस नागेशकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक आयुक्त समाधान भोसले, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी संतोष दळवी, किर्लोस्कर कमिन्स इंडिया एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष सुधीर सरोदे,वालचंदनगर शुगर्स वर्कर्स युनियनचे अध्यक्ष युवराज रणवरे, कामगार भूषण सौ.शैलजाताई करोडे यांनी भाग घेतला. मंडळाचे उपाध्यक्ष राज अहिरराव यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांच्याशी वैचारिक संवाद साधला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात उपाध्यक्ष तानाजी एकोंडे यांनी मंडळाचे उद्देश कथन केले,तर सचिव राजेश हजारे यांनी मंडळाच्या माध्यमातून राबविलेल्या योजनांची माहिती दिली.
या प्रसंगी हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव व महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त रविराज ईळवे यांचा ध्वनी संदेश ऐकविण्यात आला. गुणवंत कामगारांच्या वतीने संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.भारतीताई चव्हाण यांचा ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के, ज्येष्ठ गुणवंत कामगार महिला सौ सुशिला फटांगरे आणि मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ आणि तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.मानपत्राचे वाचन सहसचिव संजय गोळे यांनी केले.

अध्यक्षा डाँ.भारती चव्हाण यांनी आपल्या भाषणात कामगार भुषण हा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानूसार प्रत्येक विभागातुन स्वतंत्रपणे द्यावेत, तसेच कामगार भुषण मिळवण्यासाठीची अट गुणवंत पुरस्कारानंतर १० वर्षाची आहे ती पाच वर्षाची करावी.असा ठराव मांडला.यांस सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले हा ठराव उपस्थित उपायुक्त मा. समाधान भोसले यांनी तो प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन या ठिकाणी दिले आहे.

गुणवंत कांमगार पुरस्कार मिळालेनंतर गुणवंतांची भुमिका या विषयावर बोलताना डाँ.भारती चव्हाण म्हणाल्या,गुणवंत कामगारांनी सामाजिक कार्यात सक्रिय राहुन गुणवंत समाज निर्माण करण्याची आवश्यकता आहे कामगार कल्याण मंडळाला मिळालेल्या भुखंडावर कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बहुऊद्देशिय प्रकल्प उभा करणेसाठी प्रयत्नशील राहणार आहोत ..आणि त्यामध्ये कामगार कुटुंबिय महिलांसाठी स्वरोजगार प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.कंपनी व्यवस्थापनाने कामगार हिताचे धोरण ठरविण्याची गरज आहे.टाटा मोटर्स या व्यवस्थापनाकडून कामगार हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात.त्यांना प्रोत्साहन दिले जाते आणि यामुळेच या वर्षीचा कामगार पुरस्कर्ते व्यवस्थापन म्हणून टाटा मोटर्सचा गौरव आपण करत आहोत.असेच काम करणाऱ्या व्यवस्थापनाला दरवर्षी हा सन्मान दिला जाईल.

यानंतर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल्या पिंपरी येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला कामगार मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.टाटा मोटर्स व्यवस्थापनाला कामगार पुरस्कर्ते व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.कामगार भूषण पुरस्कारार्थी राजेन्द्र वाघ,२०१५,२०१७ आणि २०१९ च्या गुणवंत कामगारांना श्रमगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.तसेच प्रातिनिधीक स्वरुपात ज्येष्ठ गुणवंत,पत्रकार शिवाजी शिर्के, जादूगार रामचंद्र चडचणकर आणि कामगार भूषण जयवंत भोसले यांनाही श्रमगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.पंतप्रधान श्रम पुरस्कार प्राप्त सुनिल नायकवाडी, सुभाष चव्हाण, वसंत भांदुर्गे,शांताराम भोर,बाजीराव सातपुते,राकेश देशमुख,कैलास माळी व हेमंत माथाडे यांनाही श्रमगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कामगार कुटुंबातील कन्या कु.आर्या राहुल ,कु.श्वेता कदम ,कु.सौ.चेतना घोजगे तसेच सौ.राधिका जोशी (वैद्यकीय) सौ,गिता भांदुर्गे ( शैक्षणिक)सौ.सविता बारावकर ( सामाजिक ) क्षेत्रातील कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले तसेच गुणवंत पुरस्कार मिळालेनंतरही सातत्याने आपले कार्य करीत असलेल्या कामगार कार्यकर्त्यांच्या संस्था, नवयुग साहीत्य शैक्षणिक मंडळ,वसुंधरा संवर्धन प्रतिष्ठाण ,शिवशंभो फौंडेशन ,नेचर डिलाईट फौंडेशन,मानवी हक्क जाग्रती संरक्षण ,संस्कार प्रतिष्ठाण ,विक्रम शिला प्रबोधिनी,मौलाना आझाद सोशल फौंडेशन , कडेगाव तालुका मित्र मंडळ,पार्थ महिला बचत गट,मानिनी फौंडेशन या संस्थाचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला..

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री भरत बारी आणि सौ.रेणुका राजेश हजारे यांनी केले.पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री महंमद शरिफ मुलाणी यांनी आभार प्रदर्शन केले या संपुर्ण मेळाव्याचे संयोजन गुणवंत कामगार सर्वश्री राजेश हजारे,तानाजी एकोंडे,राज अहेराराव,संजय गोळे, भरत शिंदे,श्री गोरखनाथ वाघमारे श्री श्रीकांत जोगदंड श्री महमंदशरीफ मुलाणी,श्री महादेव धर्मे,कल्पना भाईगडे,सतिष देशमुख,ज्ञानेश्वर मलशेट्टी,अशोक सरपाते,सुनिल अधाटे,लक्ष्मण इंगवले,अण्णा गुरव,चंद्रकांत लव्हाटे,उद्धव कुंभार आणि सौ.संगिता जोगदंड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *