पिंपरी, दि. 27 – हॉटेल मध्ये काम करताना ते मनापासून केले पाहिजे, त्यासाठी चिकाटी,जिद्द आणि मेहनत असली पाहिजे. तरच तुम्ही चांगले सेफ होवू शकता म्हणून ”डर के आगे जीत है” असा संदेश विष्णुजीकी रसोई सुप्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एचएमसीटी, ताथवडे यांनी 25 आणि 26 एप्रिल 2022 रोजी एव्हरेस्ट बेटर किचन कुलिनरी चॅलेंज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर, कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका बेटर किचन मॅगझिनच्या व्यवस्थापकीय संपादिका सुश्री एकता भार्गव, डॉ.डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एचएमसीटी चे प्राचार्य डॉ. मिलिंद पेशवे, वेस्टर्न इंडिया कलिनरी असोसिएशनचे सदस्य आणि नामांकित हॉटेल्समध्ये कार्यकारी शेफ म्हणून कार्यरत असलेले व्हीआयपी शेफ सुधीर पै, गौतम महेरुषी, विवेक कदम, रंजन रजनी, कमलेश साळवे, तुषार मलकानी, जरसन फर्नाडिस, निलेश लिमये, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

देशातील आघाडीच्या हॉस्पिटॅलिटी संस्थांमधील 400 हून अधिक संघांच्या सहभागाने ही स्पर्धा देशभरातील 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात आली होती. 25 एप्रिल 2022 रोजी पुणे शहर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात पुणे आणि लगतच्या शहरांमधील 42 संघांचा सहभाग होता. पुण्यातील स्पर्धेत डॉ. डी वाय पाटील IHMCT ची टीम विजेता म्हणून आणि सिम्बायोसिस स्कूल ऑफ कलिनरी आर्ट्सला उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले.
या सर्व 10 शहरांतील विजेत्यांनी 26 एप्रिल 2022 रोजी DYPIHMCT द्वारे आयोजित केलेल्या महाअंतिम फेरीत भाग घेतला आणि त्यानंतर मंगळवारी (दि. 26) सायंकाळी 5 वाजता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

महाअंतिम फेरीत पाटकर वर्दे CHM, मुंबईचा संघ विजेता, SRM IHM, चेन्नई प्रथम उपविजेता आणि डॉ. DY पाटील IHMCT द्वितीय उपविजेता म्हणून घोषित करण्यात आला. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. मिलिंद पेशवे, ताथवडे यांच्या नेतृत्वाखाली झाला. कार्यक्रमाला डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार देविका मुतालीक यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *