पिंपरी :- भारत सरकार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल “ओपन डेटा विक”, “क्लायमेट चेंज” आणि “प्लेस मेकींग” हे  तीन पुरस्कार तसेच कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना, कार्यपध्दतींचा अंगीकार, ई-गव्हर्नन्स आणि लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमात राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान व स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिका राज्यस्तरावर अव्वल ठरली असून राज्य शासनाच्या वतीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ब वर्ग महापालिकांच्या गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला, याबद्दल आज महापालिका अधिका-यांच्या वतीने प्रशासकीय नेतृत्व व मार्गदर्शन करणारे आयुक्त राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या सत्कार प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप,  शहर अभियंता राजन पाटील  यांच्यासह सर्व उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *