एस. एम. देशमुख सरांची सोशल मिडियावर बदनामी करणाऱ्यास ताबडतोब अटक करा ; पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे पोलीस आयुक्तांना निवेदन…

पिंपरी : मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्यावर सोशल मिडियावर बदनामी केल्या मुळे मंगळवार (दि.१२) रोजी शैलेश पालकर (पोलादपूर जिल्हाध्यक्ष रायगड) व प्रशांत अष्टेकर (मुंबई) यांचे विरोधात पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या वतीने पी.आय. भोसलेसाहेब यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले.

यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्या मार्गदर्शनाखाली, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रवीण शिर्के, पिंपरी चिंचवड सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सुरज साळवे, पत्रकार हल्ला समितीचे सदस्य अनिल भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांना मा. धर्मदाय आयुक्त यांनी रायगड जिल्ह्यात जमिन दिली व ती त्यांनी परस्पर विकून पैसे हडप केले, असे आरोप करणारे संभाषण शैलेश पालकर व प्रशांत अष्टेकर यांनी भ्रमणध्वनीवर केले व ती संभाषण ध्वनी राज्यातील अनेक ग्रुपवर प्रसारीत केली. वास्तविक मा. धर्मदाय आयुक्त यांनी अशाप्रकारे कुठलीच जमिन एस. एम. देशमुख यांना दिलेली नाही. त्यामुळे ती परस्पर विकण्यासाठी विषय नाही. असे असतांना केवळ एस. एम. देशमुख यांना अशा खोट्या आरोपावरून राज्यभर बदनाम करण्याचा प्रयत्न उपरोक्त “जोडगोळी”ने केला आहे.

एस. एम. देशमुख हे राज्यातील तमाम पत्रकार बांधवांचे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना बदनाम करुन मराठी पत्रकार परिषदेच्या हजारो सभासदांचे खच्चीकरण करण्याचा कुटील डाव असुन या आरोपींवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *