पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश घोरपडे तर सरचिटणीस म्हणून सुरेश कंक यांची निवड…

फुगेवाडी :- पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘शिवसुमन’ फुगेवाडी येथे नुकतीच घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी कामगारभूषण पुरुषोत्तम सदाफुले होते.

ज्येष्ठ समाजसेवक पद्यभूषण आण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीस वर्षांपासून पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती सातत्यपूर्ण कामगारहित जोपासून कार्यरत आहे.यापुढील काळात गुणवंत कामगार शासनाकडे स्वतःसाठी काही न मागता निस्वार्थ बुद्धीने सामाजिक, शैक्षणिक मूल्यांचे जतन करून काम करीत राहतील असा विश्वास पुरुषोत्तम सदाफुले यांनी व्यक्त केला. सर्वानुमते
अध्यक्ष म्हणून प्रकाश बाजीराव घोरपडे तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र हिरामण वाघ यांची निवड करण्यात आली.
सरचिटणीस- सुरेश कंक, चिटणीस- सौ संगीता श्रीकांत जोगदंड
उपाध्यक्ष– बाजीराव सातपुते, सुभाष चव्हाण
कोषाध्यक्ष- तानाजी एकोंडे, सह कोषाध्यक्ष– सोमनाथ कोरे, संघटक- मनोहर दिवाण, पंकज पाटील
सदस्य- आण्णा गुरव,शामराव साळुंखे, प्रकाश देवरूककर, विकास कोरे, पांडुरंग दोडके, दत्तात्रय गायकवाड
प्रसिद्धी आणि जनसंपर्क प्रमुख- श्रीकांत जोगदंड
तर सल्लागार म्हणून पुरुषोत्तम सदाफुले, शिवाजीराव शिर्के, शिवाजीराव खटकाळे यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *