पिंपरी :- पुणे मेट्रोला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पिंपरी ते फुगेवाडी या स्टेशनवरुन पिंपरी-चिंचवडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी मेट्रोचा प्रवास करून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळविला.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन पार पडले. मोदींच्या हस्ते दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यातील एक वनाझ ते रामवाडी हा मार्ग १३ किलोमीटरचा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे. याच मार्गाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडले. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग १२ किलोमीटरचा असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरचे काम पूर्ण झालं आहे. पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गाचेही उद्घाटन आज पार पडले.
पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गेकेचे पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. त्यानंतर येथील पदाधिकाऱ्यांनी यांनी मेट्रोतून प्रवास केला.
यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, उपमहापौर नानी घुले, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर नितीन काळजे, सदाशिव खाडे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, केशव घोळवे, कमल घोलप, राजेश पिल्ले, माऊली थोरात, भीमाबाई फुगे, सागर गवळी, कुंदन गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, संकेत चोंधे, झामाताई बारणे, सुनीताताई तापकीर, निर्मला ताई कुटे, स्विनल म्हेत्रे, आरती चोंधे, सुरेश भोईर, हर्षल ढोरे, अनुराधा गोरखे, मनीषा पवार, सविता खुळे, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, केशव घोळवे, बाबा त्रिभुवन, अभिषेक बारणे, माऊली थोरात, संदीप कस्पटे बापू काटे आदी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.