पिंपरी दि. १४ फेब्रुवारी २०२२ :- सपुंर्ण देशाबरोबरच पिंपरी चिंचवड शहरालाही कोविड-१९ महामारीच्या प्रादुर्भावाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला आहे. तथापि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या महत्वकांशी कोविड लसीकरण मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास प्राध्यान्य दिले. केंद्रसरकारने ठरवुन दिलेल्या नियोजनानुसार पिंपरी चिंचवड शहरात आज अखेर १७९३८९४ नागरिकांनी डोसची पहिली मात्रा १५२८४८२ नागरिकांनी डोसची दुसरी मात्रा त्याचप्रमाणे ३८६९८ नागरिकांनी बुस्टर डोसची मात्रा असे एकुण ३३६१०७४ नागरिकांनी लसीकरणाची मात्रा घेतलेली आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील ७७८०९ मुलामुलींनी डोसची मात्रा घेतलेली आहे. या महत्वाकांशी लसीकरण मोहीमेचा प्रभावी अंमल केल्यामुळे तसेच कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुयोग्य नियोजन करुन जनजागृती केल्यामुळे आज पिंपरी चिंचवड शहराची १००% कोविड-१९ प्रतिबंधाच्या लसीकरणाकडे वाटचाल सुरु आहे. अशा माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

याबाबतची माहिती देताना ते म्हणाले की, शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोविड-१९ लसीकरण झाल्यामुळे कोविड-१९ चा प्रादुर्भाव होवुन सुध्दा रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे कोविड-१९ चा प्रादुर्भाव होवुनही रुग्णांना रुग्णालयीन उपचार घेण्याची सुध्दा गरज पडत नाही यावरुन लसीकरण हाच यावर रामबाण उपाय असुन लसीकरण हेच कोविड-१९ चा प्रादुर्भाव न होण्यासाठी कवच असल्याचे वर नमुद केलेल्या आकडेवारी वरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे शहराचे १००%  कोविड-१९ प्रतिबंधाच्या लसीकरणाचे उद्धिष्ट पुर्ण करण्यासाठी ज्या नागरिकांनी अद्याप कोविड लसीकरण करुन घेतलेले नाही अशा नागरिकांना स्वयंस्फृर्तीने आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रात जावून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *