– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती…
– कामगारांनी पेढे वाटून अन् आतषबाजी करीत साजरा केला आनंदोत्सव…
पिंपरी ।प्रतिनिधी :- चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे येथील ट्रॅक कंपोनंट लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या वेतनवाढ करारावरती आमदार महेश लांडगे व रोहिदास गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे हा कार्यक्रम पार पडला. ट्रॅक कंपोनंट लि. या कंपनीकडून वेतनवाढ घेण्यासाठी स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेने पुढाकार घेतला. कामगारांचे हित लक्षात घेत कंपनीने देखील कामगारांना भरघोस पगारवाढ जाहीर केली. पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे हे स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे प्रमुख सल्लागार आहेत. त्यांच्यासह प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे पाटील, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे याकामी पुढाकार घेतला आहे.
यावेळी संघटनेचेसरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शाम सुळके, खजिनदार अमृत चौधरी, माथाडी कामगार नेते किसन बावकर, माजी नागरसेवक शांताराम भालेकर, भाजपा शहर उपाध्यक्ष अनिल लोंढे, साईराज येळवंडे, तेजश बीरदवडे, प्रशांत पाडेकर, सोमनाथ जानराव, रविंद्र भालेराव, यूनिट अध्यक्ष दिपक बऱ्हाटे, उपाध्यक्ष मिंन्टू कुमार, सरचिटणीस प्रवीण वाडेकर, सहचिटणीस अनिल कुंभार, खजिनदार सवाई सिंह, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे सी.इ.ओ. राजेश खन्ना, प्लांट हेड. गिरीश भेंडगावे, एच. आर. मॅनेजर अविनाश चोरमाले यांनी सह्या केल्या आहेत.
कंपनीचे सी.ई. ओ. राजेश खन्ना यांनी उपस्थित कामगार व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, पुजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्येक्त केला.
… करारानुसार कामगारा असा होणार लाभ!
१२ हजार ५०० रुपये प्रत्यक्ष पगार वाढ ही पहिल्या वर्षी ८० टक्के दुसऱ्या वर्षी १० टक्के आणि तिसऱ्या वर्षी १० टक्के मिळणार आहे. कराराचा कालावधी तीन वर्षांचा राहणार आहे. मेडिक्लेम पॉलीसी, बफर पॉलीसी, मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, सूटया :- PL – १५, SL – ०८, CL – ०८, PH – १०, तसेच, मतदानाची सुट्टी सरकारी आदेशानुसार राहील. F) शॉर्ट लिव्ह – एका महिन्यात दोन वेळा देण्यात येणार आहे. दिवाळी बोनस:- १५ हजार २०० रुपये आणि एक भेटवस्तू, वैयक्तिक कर्ज सुविधा, वार्षिक स्नेह संमेलन, प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ९ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभीमानी श्रमिक कामगार संघटनेचे जीवन येळवंडे यांनी दिली.