पिंपरी :- निराधारांची निस्वार्थी सेवा करणाऱ्या पिंपरीतील सावली निवारा ‘केंद्रास महाराष्ट्र प्रेस क्लब’च्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त क्लबच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दीनदयाल अंत्योदया योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका डे एनयूएलएम अंतर्गत सावली निवारा केंद्र संचलित रिअल लाईफ रिअल पीपलचे एम. ए. हुसैन यांनी पत्रकार दिनानिमित्त केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी क्लबच्या सदस्यांनी निवारा केंद्रातील निराधारांची विचारपूस करून संस्थेच्या कामाची माहिती घेतली.

या वेळी महाराष्ट्र प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा महा ई न्यूजचे अमोल शित्रे, लोकशक्ती न्युजचे विकास शिंदे, लोकमान्य टाईम्सचे संजय शिंदे, डेली महाराष्ट्र न्यूजचे प्रदीप लोखंडे, पुण्यनगरीचे अमोल काकडे, पुढारीचे विजय जगदाळे, निर्भीड सत्ताचे प्रशांत साळुंखे, लोकमराठीचे रवींद्र जगधने आदीसह महाराष्ट्र प्रेस क्लबचे सदस्य, पत्रकार उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शहरी निराधारांसाठी तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये सध्या 52 निराधार व्यक्ती राहत आहेत. सदर निवारा केंद्रांमध्ये फुटपाथवर झोपणारे दिव्यांग, मनोरुग्ण, मतिमंद वृद्ध वास्तव्य करत आहे. रस्त्यावरील लोकांना समुपदेशन करून त्यांना निवारा केंद्रामध्ये आणण्यासाठी निवारा केंद्राचे पथक फिरत असते. निवारा केंद्रामधील लाभार्थ्यांना समुपदेशन करून त्यांच्या नवीन जीवनमान सुधारण्यासाठी लघुउद्योग, त्याच बरोबर नोकरी शोधून देण्यास मदत केली जात आहे. बऱ्याच लाभार्थ्यांच्या नातेवाईकांचा शोध विविध पद्धतीने घेतला जातो. त्यांना घरी पाठवण्यासाठी सावली निवारा केंद्र प्रयत्न करत असते.

त्यांच्या कार्याला मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनाचे औचीत्त्य साधून धान्य वाटप केले. या वेळी २५ किलो तांदूळ, २० किलो आटा, १५ किलो खाद्यतेल, १ किलो तूप आदी रिअल लाईफ रिअल पीपलचे एम. ए. हुसैन यांच्याकडे सुपूर्द केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *