पिंपरी (प्रतिनिधी):- अनाथांचा आधार स्वर्गीय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या मांजरी येथील सन्माती बाल निकेतन संस्थेला पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे यांनी भेट दिली. त्यांनी माईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून वाढदिवसाचे औचित्य साधून या आश्रमासाठी एक लाख रुपयांच्या मदतनिधी दिला.
आरंभ सोशल फाउंडेशन, तुषार हिंगे युवा मंचच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत सिँधूताई सपकाळ यांच्या मानसकन्या विद्या यांच्याकडे हा 1 लाखाचा धनादेश सुफूर्द करण्यात आला. माजी महापौर तुषार हिंगे म्हणाले की, स्वर्गीय पद्मश्री अनाथांच्या माई यांची उणीव संपूर्ण महाराष्ट्रात जाणवणार आहे. त्यांनी परिश्रमातून उभे केलेले सामाजिक कार्य अजरामर झालेले आहे. त्यांच्या कार्यामुळे हजारो निराधार मुला-मुलींना आधार मिळाला. त्यांचा जगण्याला आयाम देण्याचं काम माईनी केले. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे काम अविरत सुरू राहावे. या सामाजित हेतूकरिता त्यांच्या मदतीसाठी कायम पाठबळ दिले जाईल.
यासह कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीमुळे वाढदिसानिमित्त सामाजिक उपक्रम वगळता सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचे तुषार हिंगे सांगितले आहे.