फलटण, दि. 4 : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते होणार आहे.  संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा पुरस्कार वितरण समारंभ पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’सभागृहात गुरुवार दि.6 जानेवारी 2022 रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी स.10:30 वा. आयोजित केल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या समारंभात सन 2019 व सन 2020 च्या प्रतिष्ठेच्या ‘दर्पण पुरस्कारां’चे वितरण होणार आहे. सन 2019 चे ‘दर्पण’ पुरस्कार प्राप्त पत्रकारांमध्ये जेष्ठ संपादक पुरस्कार – शिवाजीराव शिर्के (संपादक, सा. पवनेचा प्रवाह, पुणे), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत धाडसी पत्रकार पुरस्कार राहुल तपासे (सातारा जिल्हा प्रतिनिधी, ए.बी.पी.माझा), ‘दर्पण’ पुरस्कार मुंबई विभाग – विनया देशपांडे (मुंबई ब्युरो चीफ, सीएनएन न्यूज 18), पश्‍चिम महाराष्ट्र विभाग – गुरुबाळ माळी (सहाय्यक संपादक, महाराष्ट्र टाईम्स, कोल्हापूर), मराठवाडा विभाग – दयानंद जडे (संपादक, दै.लातूर समाचार, लातूर), विदर्भ विभाग – अनिल अग्रवाल (संपादक, दै.मातृभूमी, अमरावती), कोकण विभाग – संतोष कुळकर्णी (प्रतिनिधी, दै.सकाळ, देवगड), उत्तर महाराष्ट्र विभाग – निशांत दातीर (संपादक, निशांत दिवाळी विशेषांक, अहमदनगर), विशेष दर्पण पुरस्कार – जयपाल पाटील (संपादक, सा.रायगडचा युवक, अलिबाग), सुभाष भांबुरे (प्रतिनिधी, दै.नवराष्ट्र, फलटण) यांचा समावेश आहे.

तर सन 2020 च्या दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकारांमध्ये जेष्ठ पत्रकार पुरस्कार – योगेश त्रिवेदी (मुक्त पत्रकार तथा माध्यम तज्ज्ञ, मुंबई), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत धाडसी पत्रकार पुरस्कार – मंगेश चिवटे (पत्रकार, मुंबई), ‘महिला दर्पण पुरस्कार -नम्रता फडणीस (प्रतिनिधी, दै.लोकमत, पुणे), दर्पण’ पुरस्कार मुंबई विभाग – रवींद्र मालुसरे (मुख्य संपादक, पोलादपूर अस्मिता, मुंबई), पश्‍चिम महाराष्ट्र विभाग – विनोद शिरसाठ (संपादक, सा.साधना, पुणे), मराठवाडा विभाग – आनंद कल्याणकर (आकाशवाणी प्रतिनिधी, नांदेड), विदर्भ विभाग – डॉ.रमेश गोटखडे (स्तंभलेखक, दै.हिंदुस्थान टाईम्स, अमरावती), कोकण विभाग – बाळकृष्ण कोनकर (संपादक, सा.कोकण मिडीया, रत्नागिरी), उत्तर महाराष्ट्र विभाग – मिलींद चवंडके (पत्रकार, अहमदनगर), विशेष दर्पण पुरस्कार – अ‍ॅड.बाबूराव हिरडे (संपादक, सा.कमलाभवानी संदेश, करमाळा), प्रा.रमेश आढाव (प्रतिनिधी, दै.तरुण भारत, फलटण), शिवाजी पाटील (प्रतिनिधी, दै.लोकमत, तारळे खुर्द) यांचा समावेश आहे.

‘कोरोना’ परिस्थितीमुळे सन 2019 व सन 2020 या दोन वर्षांचे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले होते. यंदाच्या राज्यस्तरीय पत्रकार दिनी या पुरस्कारांचे वितरण आयोजित केले असून सध्याच्या शासन नियमानुसार केवळ 50 लोकांच्या उपस्थितीतच मर्यादित स्वरुपात हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटूंबीय यांच्यावतीने प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *