पिंपरी :- आज दिनांक २५.१२.२०२१ रोजी सांगवी, माकन हॉस्पिटल चौक, कामगार नाका येथे  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजने अंतर्गत नोंदणी झालेले बांधकाम कामगार यांना  मा. शंकरशेठ  पा. जगताप यांच्या हस्ते  सुरक्षासंच वाटप करण्यात आला.
त्याप्रसंगी  पिंपरी- चिंचवड मनपाच्या नगरसेविका उषाताई मुंढे , नगरसेवक संतोष कांबळे, हर्षल ढोरे, राजेंद्र राजापुरे, शारदा सोनवणे , अंबरनाथ कांबळे, महेश जगताप,शशिकांत कदम , जवाहर ढोरे, अप्पा ठाकर, हिरेन सोनवणे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  बांधकाम कामगार मंडळाचे  गणेश पुसाळकर, राजेश येशी, आदित्य कांबळे, सागर मोरे यांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले.
या सुरक्षा संचामध्ये पेटी, चटई, मच्छरदाणी, तीन तळ्याचा डब्बा, पाण्याची बाटली, सेफ्टी शूज, उंचीवर काम करताना लागणार सेफ्टी बेल्ट, हेलमेट, स्पोर्ट बॅग, रेडियम असलेला जॅकेट,इत्यादी वस्तूंचा समावेश असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *