– पिंपरी-चिंचवड भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जयंतीदिनी शब्दांजली
पिंपरी । प्रतिनिधी :- भारतरत्न व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय राजकारणाला आदर्शभूत राजकारणाचा वस्तुपाठ घालून दिला, अशा भावना भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने भारतरत्न व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी मोरवाडी येथील पक्षकार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, बाबू नायर, विजय फुगे, नगरसेवक व स्थायी समिती माजी सभापती विलास मडीगेरी, नगरसेवक शीतल शिंदे, नगरसेविका माधवी राजापुरे, महिला आघाडी प्रदेश कोषाध्यक्ष शैला मोळक, शहर उपाध्यक्ष नंदू दाभाडे, प्रकाश जवळकर, समीर जवळकर, अजय पाताडे, शहर चिटणीस देवदत्त लांडे, राजेंद्र ढवळे, विनोद मालु, योगेश सोनवणे, दिव्यांग सेलचे अध्यक्ष शिवदास हांडे, माजी नगरसेवक बाळासाहेब भुंबे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, गुजराथी आघाडी अध्यक्ष मुकेश चुडासमा, शिक्षक आघाडीचे सरचिटणीस कांबळे सर, मंडल अध्यक्ष,विनोद तापकीर, महादेव कवितके, महिला आघाडी मंडल सरचिटणीस कविता करदास, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी, मंडल सरचिटणीस नंदू भोगले, नितीन अमृतकर, मधुकर बच्चे, युवा मोर्चा शहर चिटणीस मुक्ता गोसावी, सतपाल गोयल, मनोज तोरडमल, सौरभ शिंदे, कोमल काळभोर, कार्यालय प्रमुख संजय परळीकर आदी उपस्थित होते.
अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व प्रत्येक भारतीयांना आदर्शस्थानी आहे. आदर्श राजकारणाचा वस्तुपाठ वाजपेयी यांनी घालून दिला. त्यांच्या कवितांमधून भारताच्या ओजस्वीतेचे दर्शन त्यांनी संपूर्ण जगाला घडवले. अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.