पिंपरी :- विद्यार्थ्यांनो तुमच्या चारित्र्याला, व्यक्तिमत्वाला कोणताही डाग लागणार नाही याची तर काळजी घ्या आणि जननी,जन्मभूमी यांना कधीही विसरु नका. असा मोलाचा संदेश कामगार साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिला. निमित्त होते खिंवसरा पाटील शिक्षण संकुलात महाराष्ट्र राष्ट्रभाषा परिषदे तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत विशेष योग्यता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आणि राष्ट्रीय गणित दिनाचे..

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना पुरुषोत्तम सदाफुले यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा दिला. आईसंदर्भातील शालेय जीवनातील आठवण सांगताना ते भावूक झाल्याने आईला व भारतमातेला कधीही विसरु नका असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.तसेच त्यांनी आईचे मोठेपण सांगणारी भावनाप्रधान कविता सादर केली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड.सतिश गोरडे यांचा 52 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या शुभप्रसंगी कवीवर्य सुरेश कंक, साहित्यिक सुभाष चव्हाण, ॲड.सतिश गोरडे,शालासमिती अध्यक्ष नितीन बारणे,माजी व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे,मुख्याध्यापक नटराज जगताप, प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर,बालविभाग प्रमुख आशा हुले,सर्व शिक्षक,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी कविवर्य सुरेश कंक यांनी योगाचे महत्व सांगणारी कविता सादर केली.इ. ९ वी मधील संचिता काशिदे हिने गीत गायनातून, तर इ. ६ वी मधील आकांक्षा रोडे हिने इंग्रजी भाषेतील मनोगतामधून आणि सहशिक्षिका प्रमोदिनी बकरे व योगिता गायकवाड यांनी स्वरचित कवितेमधून ॲड सतिश गोरडे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सहशिक्षिका योगिताा गायकवाड यांनी गाईच्या शेणापासून बनविलेल्या पर्यावरण पूरक ५२ पणत्यांच्या द्वारे ॲड सतिश गोरडे यांना औक्षण करण्यात आले.औक्षणाची ही भारतीय संस्कृती परंपरा जोपासताना गोरक्षणाचाही संदेश या उपक्रमातून देण्यात आला. तसेच यावेळी सहशिक्षिका साक्षी कुरळे यांनाही जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी इ. ६ वी मधील साक्षी मोहोड या विद्यार्थीने ॲड.सतिश गोरडे व सहशिक्षिका साक्षी कुरळे यांचे काढलेले पेन्सिल स्केच त्यांना भेट देण्यात आले.

तसेच राष्ट्रीय गणिती दिवसाचे महत्व,श्रीरामानुज यांचे कार्य सहशिक्षिका अनुराधा नरवडे यांनी सांगितले तर गणितातील आकडेमोड,सूत्रांचे महत्व व्यक्त करणारी कविता इ. ६ वी मधील राजवीर माने या विद्यार्थ्याने सादर केली. यावेळी महाराष्ट्र राष्ट्रभाषा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या हिंदी भाषा परीक्षेत विशेष योग्यता मिळालेल्या पुढील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
१) अक्षदा गोरे.(इ. ६ वी.)
२) आकांक्षा रोडे.( इ.६वी.)
३) देवेंद्र जाधव.(इ. ६ वी.)
४) सरगम गरड.(इ. ६ वी.)
५)अंकिता चौहान (इ.७वी)
६) श्वेता दाभाडे.(इ. ७ वी)
७) श्रेया नलावडे.(इ. १०वी)
८)रिया हावळे.(इ.९ वी)
९)सोहम कांबळे.(इ. ८वी)
वाढदिवसाच्या सदिच्छांना प्रतिसाद देताना ॲड. सतिश गोरडे यांनी सर्वांचे आभार मानले तसेच संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.आगामी काळात संस्थेतर्फे होणार्‍या कार्यक्रमांची रुपरेषा त्यांनी सर्वांसमोर मांडली. यावेळी सहशिक्षिका योगिनी नरुटे यांनी नृत्यदिग्दर्शन केलेल्या विद्यार्थीनी नृत्याने सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका मंजुषा गोडसे यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ सहशिक्षिका माधुरी कुलकर्णी यांनी मानले.सहशिक्षिका कृतिका कोराम यांनी उत्तम सूत्रसंचालन करत कार्यक्रमांची सांगड घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *