पिंपरी :- चिखली येथील गट क्रमांक ५३९ मधील पेठ  क्रमांक १३ येथील चार हेक्टर जागेचा ताबा  २४/०८/२०२१ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांना मिळाला असून  सदर शासकीय जागेवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय  पिंपरी-चिंचवड या कार्यालयासाठी तातडीने वाहन तपासणी केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरु  असल्याचे आश्वासन मा.ना.अनिल परब यांचे आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या कपात सुचनेला उत्तर देताना  लेखी स्वरुपात आश्वासीत केले.

सन २०२१ च्या प्रथम अधिवेशनात मांडण्यात आलेली अर्थसंकल्पीय कपातसूचना क्र. २६८३-उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची मागणी वाढत असल्याने पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची जागा अपुरी पडणे. वाहन तपासणी केंद्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली चिखली येथील सदर चार हेक्टर शासकीय जागा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे मंजुरी करता पाठवण्यात येणे. चिखली येथील गट क्रमांक ५३९ मधील पेठ  क्रमांक १३ येथील चार हेक्टर शासकीय जागा तातडीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांच्याकडे हस्तांतरित करण्याबाबत शासनाने करावयाची तातडीची उपाययोजना व कार्यवाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *