पिंपरी :- पिंपरी-चिंचवड मधील भोसरी गाव कुस्ती आणि रांगडेपणा यासाठी प्रसिद्ध आहे. याच भोसरीतील तरुणांनी ‘होनाजी बाळा व कवी अनंत फंदी या नाटकाची निर्मिती केली, बालगंधर्व रंगमंदिरात त्याचा प्रयोग करण्याचे स्वप्न उराशी बाळगले, ते प्रत्यक्षात आणले. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. ही अचंबित करणारी घटना आहे.

कवी अनंत फंदी हे नाटक 25 ऑक्टोबर 1971 रोजी बालगंधर्व रंग मंदिरात सादर झाले. त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली ही भोसरीच्या संस्कृती इतिहासातील एक फार मोठी घटना आहे. भोसरीतील कृष्णा नथू फुगे यांच्या पुढाकारातून 1961 मध्ये भोसरी ग्रामसेवा विद्यार्थी मंडळाची स्थापना झाली. गावातील तरुणांनी एकत्र येऊन अनेक उपक्रम केले. अनेक नाटकांची निर्मिती केली. त्यामध्ये होनाजी बाळा, शाहीर अनंत फंदी, शिवा रामोशी, बेबंदशाही, तीन पिढ्यांचा वैरी. नवा संसार, दसरा उजाडला, दिवा जळू दे सारी रात. अशा अनेक नाटकांचा समावेश होता. 1962 ते 72 या काळात या नाटकांचे परिसरात अनेक प्रयोग केले.

या नाटकामध्ये नामदेवराव माने पाटील नारायण राघोजी फुगे, सखाराम विष्णू गव्हाणे, रघुनाथ गव्हाणे, बाळासाहेब लक्ष्मण लांडगे, राम गव्हाणे बबन गुळवे, हनुमंत लांडगे, सयाजी लांडगे, मारुती लांडगे, बाळासाहेब लक्ष्मण लांडगे हनुमंतराव लांडगे सयाजी लांडगे परशुराम फुगे शिवराम माने, मारुती गव्हाणे, रघुनाथ गव्हाणे, रमेश डोळस ,कृष्णा फुगे आदींनी भूमिका केल्या होत्या. तसेच गावातील प्रतिष्ठित असे माजी आमदार सोपान फुगे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, बाळासाहेब शंकरराव लांडगे, मारुती गव्हाणे, विठोबा लांडे यांनी तरुण मंडळाला सहकार्य केले होते. अशा प्रकारची नाटके सत्तरच्या दशकात पिंपरी-चिंचवडमधील अनेक गावात होत होती. हौशी नाटक मंडळींनी बसवलेल्या, नाटकातून मिळणारे उत्पन्न त्यांनी गावातील विकासासाठी खर्च केला होता. अशाप्रकारे कला आणि विकास यांचा संयोग या परिसरात पाहायला मिळतो. याचा उल्लेख लेखक श्रीकांत चौगुले यांच्या गाव ते महानगर या पुस्तकात आढळतो.

अनंत फंदी व इतर नाटकांचे प्रयोग सादर करणारी मंडळी आज हयात नाहीत किंवा वयोवृद्ध झाले आहेत. अनेक तरुणांनी या नाटकाचा प्रयोग पाहिला होता. त्यापैकी बाळासाहेब गव्हाणे यांनी आठवण सांगितली,” आम्ही कॉलेजला असताना हा प्रयोग झाला. त्यावेळी नाटकाची पंचक्रोशीत चर्चा झाली होती. नाटकातील अनेक प्रसंग आजही आठवतात. भोसरीच्या संस्कृतिक जगतातील ही मोठी घटना आहे. असे अनेक जणांना वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *