पिंपरी :- आरंभ सोशल फाउंडेशन आणि नगरसेवक तुषार हिंगे यांच्या वतीने केंद्र सरकार पुरस्कृत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचे एक हजार नागरिकांना वाटप करण्यात आले.
पिंपरीतील मोरवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमात
प्रभाग क्रमांक 10 मधील संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर या भागातील नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ देण्यात आला. या सर्व नागरिकांना मोफत आयुष्मान भारत कार्डचे वाटप नगरसेवक तुषार हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रामदास अण्णा लुक्कर, युवा नेते दादा शिरोळे, तसेच मैत्री बुध्द विहाराचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
या योजनेबाबत माहिती देताना नगरसेवक तुषार हिंगे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोर-गरिब नागरिकांना अल्पदरात वैद्यकीय सेवा मिळावी. त्यांना सहज सर्व सुविधा उपलबध् व्हाव्यात. या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने गरीबांसाठी मोफत आरोग्य सेवा देणारी आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे सुमारे तेराशेहून अधिक प्रकारच्या आजारांवर पाच लाखांपर्यंत उपचार मिळणार आहेत. या योजनेबाबतच्या सर्व तक्रारींचे निकारकरण केले जात असून त्यांना योजनेबाबत लागणारी आवश्यक मदत व मार्गदर्शन केले जाणार आहे”.