पिंपरी :- पिंपळे गुरव येथील ममता अंधः कल्याण केंद्रातील महाराष्ट्रातील विविध जिल्हातून शिक्षणासाठी आलेल्या विशेष मुलांना स्नेहभोजन व फराळ देऊन त्याचा आनंद द्धिगुणीत केला. मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून दरवर्षी वेगवेगळ्या अनाथश्रमात व ममता अंःध कल्याण केंद्रात जाउन त्यांना स्नेहभोजन व दिवाळी फराळ देऊन त्याची दिवाळी साजरी करत आसतो. आपल्यालाही समाजाचे काहीतरी देणे आहे आणि आपण ते दिले पाहिजे या मानवतेच्या दृष्टिकोनातून तेथील विशेष. मुलांना फराळ देऊन त्याची दिवाळी सण गोड केला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचीच खरी दिवाळी साजरी झाल्याचे समाधान झाले असे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले. आम्ही सर्व पदाधिकारी यांनी ही त्यांच्या सोबत स्नेहभोजनचा आनंद घेतला. दिवाळी सण साजरा करीत आसताना आपल्या उपनगरातील कोणी उपाशी राहू नये हिच आमची इच्छा आहे.मुलांनी आम्हाला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.
यावेळी विशेष मुलांनी आपआपली मनोदय व्यक्त करून आमचे काही सहकारी प्रथम वर्ग आधिकारी झाल्याचे सांगितले व आम्ही असे अधिकारी होउन प्रशासकीय सेवेत राहून जनसेवा करणार असल्याचे चंद्रकांत ढगे यांनी सांगितले .आम्हाला वेगवेगळ्या आस्थापने आमच्या जागा शिल्लक आसतांना आम्हाला डावले जाते अशी खंत व्यक्त केली.
विकास कुचेकर म्हणाले की नागरीकांनी आपआपल्या भागातील वास्तव्यास असलेल्या गरजूंना दिवाळीच्या सणासाठी मदत करुन सामाजिक बांधिलकीची माणूस की दाखवावी असे आव्हान त्यांनी केले. 3%विशेष मुलांसाठी ज्या राखीव जागा शैक्षणिक क्षेत्रासाठी आहेत ती मुले मिळत नाहीत म्हणून भरल्या जात नाहीत, त्या भरल्या गेल्या पाहिजेत असे त्यांनी मत व्यक्त केले.
या संस्थेचे संस्थापक तुषार कांबळे म्हणाले आज तुमच्या मुळे आमच्या मुलाची दिवाळी गोड झाली .शहरातील दानशूर संस्थांनी व नागरिकांनी मदत करावी असे आव्हान केले.
संगिता जोगदंड म्हणाल्या कि तज्ञांच्या मते एक नागगोळी पेटवली तीन हजार सिगारेट ओडल्यासारखे,एक हजार लवंगी पेटवली तर सतराशे सिगारेट ओढल्यासारखे तर एक भुईचक्कर पेटवल्यास दोन हजार सिगारेट ओडल्यासारखे आहे त्यामुळे फटाके न वाजवण्याचे त्यांनी नागरिकांना आव्हान केले.
यावेळी संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्याक्षा संगिता जोगदंड, पुणे समाचार संपादक आकाश भोसले , सहसचिव गजानन धाराशिवकर,कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, युवक अध्यक्ष अतिश, गायकवाड युवक उपाध्यक्ष अक्षय जगदाळे, अशोक जाधव, रवी भेंनकी, ऋतुजा जोगदंड.मीना करंजावणे ईत्यादी उपस्थित होते.