पिंपरी :- भोसरी येथील डायनोमर्क कंपनीमध्ये खंडेनवमी निमित्त एक दिवस अगोदर कंपनीतील सर्व कामगारांनी आपल्या मशीनरीची  व सभोवतालच्या परीसराची स्वःच्छता केली. प्रत्येक कामगाराने आपल्या मशीनची नारळ फोडून, हार घालून सोसल डिस्टसिगचे अंतर  पाळुन विधिवत पूजा केली. सर्व कामगार व अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक किशोर राउत, प्रकाश अभ्यंकर व संचालिका सौ आमिता राउत, यांनी प्रथम कंपनीच्या प्रवेशद्वाराची विधिवत पूजा केली. कंपनीतील दत्त मंदिराला रंग देऊन. दत्ताच्या मंदिरासमोर सर्व कामगारांनी सोशल डिस्टसिंग नियमाचे पालन अरून ठराविक अंतर ठेवून सामुहिक आरती केली .

पालीकेकडून करारपद्धतीने झाडांचे संगोपन व संर्वधानाची जबाबदारी कंपनीने घेतली असुन व्यवस्थापकीय संचालक किशोर राउत, प्रकाश अभ्यंकर साहेब व सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. फिश पाम, व्हितळी, सोनचाफा इतर ही झाडे दुभाजक मध्ये  पालीकेने लावलेली आहेत त्याचंही आम्ही संगोपन करत आहोत असे संचालिका अमिता राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. दुभाजक मध्ये अती घाई,संकटात जाई, आवरा मनाला, सावरा जि्वाला,अशा प्रकारचे अनेक पर्यावरण, सुरक्षतेवरचे स्लोगण,लावले.

यावेळी व्यवस्थापकीय संचालक, किशोर राऊत यांनी सर्व कामगारांनी वर्षभर अपघात विरहीत केलेल्या कामाचे भरभरून कौतुक केले.कोरोनाच्या महामारीमुळे जे आपले सर्वाचे नुकसान झाले त्यासाठी सर्वांनी स्वतःची व आपल्या सहकारी कामगारांची काळजी घेऊन आपण एकमेका “साहाय्य करू अवघे धरू सुपंथ “या सहकाराच्या उक्ती प्रमाणे सर्वानी एकोप्याने,हेवेदावे न करता जास्त जास्त उत्पादन करण्याचे यावेळी आव्हान  किशोर राउत यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार आन्ना जोगदंड यांनी  “दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा” असे म्हणत दसऱ्याच्या सणाचे, खंडोनवमीचे व या काळातील आदीशक्ती देवीचे महत्व कामगारांना सांगितले. आपण आपल्या यंत्रामुळे व कंपणीमुळे प्रपंच चालवतो त्या कामाशी प्रामाणिक राहून स्वतः सुरक्षित राहून सूरक्षित काम केले पाहिजे असे मत आण्णा जोगदंड यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी संचालिका सौ.आमिता राउत यांनी सांगितले की सध्या औद्योगिक क्षेत्रात खूप मंदी आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या कंपनीचे व आपले ही खूप नुकसान झाले आहे. प्रत्येकाने उत्पादन खर्चात काटकसर करुन उत्पादन वाढवण्याचे कामगारांना आव्हान केले.

दसऱ्यानिमित्त सर्व कामगारांना कंपनीच्या वतीने सर्व स्नेहभोजन देण्यात आले.कंपनीत काही उतकृष्ट कामगारांचा सत्कार करण्यात आला.  किशोर राऊत यांच्या उपस्थितीत विभाग प्रमुख ईधाते दिलीप व मनुष्यबळ विभाग प्रमुख सुर्यकांत मुळे यांच्या हस्ते वृक्षरोपण ही करण्यात आले. सर्व कामगारांना भेटवस्तू  म्हणून आपटयाची पाने व आर्थिक मदत ही किशोर राउत यांच्या हस्ते देण्यात आले ,कामगार वेगवेगळ्या वेशभूषेत  कामावर आले होते.

मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख सुर्यकांत मुळे यांच्या संकल्पनेतन सदर कार्यक्रम झाला, त्यांनी सर्व कामगरांना कोरोना आजार होऊ नये व झाल्यावर काय काळजी घ्यावी याची माहिती सर्व कामगरांना दिली.

यावेळी, व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत, संचालिका आमीता राउत, मनुष्यबळ विभाग प्रमुख सूर्यकांत मुळे, गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, विभाग प्रमुख दिलीप ईधाते,हर्षल शेळके, मोहशकृणन अमोल पाटे,राजेश वैद्य,अकाऊंट विभाग प्रमुख  प्रविण बाराथे,अक्षरा राऊत, विनायक शेरकर, केतकी राउत  ईत्यादी विभाग प्रमुख उपस्थित होते.

मनुष्यबळ विकास प्रमुख सुर्यकांत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, रवी भेंनकी, एल्लापा पोंगुडवाला, रनजितसिंग यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *