पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा सप्ताहामध्ये आरंभ सोशल फाउंडेशन व हेल्थ व्हॅल्यू यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये पिंपरी मोरवाडी येथील कापसे गार्डन हॉल, चिंचवड शाहूनगरमधील पिरॅमिड हॉल आणि विद्यानगर येथील नगरसेवक तुषार हिंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे शिबीर होणार आहे. ५ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत दररोज सकाळी दहा ते पाच या वेळेत नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता येईल. डायबेटीस, रक्तदाब, संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, मायग्रेन, थायराईड, वाढलेले वजन, गायनायिक समस्या अशा आजारांवर विना औषध आराम मिळविण्यासाठी अॅक्युप्रेशर थेरपी उपयुक्त ठरते.

 

अॅक्युप्रेशर थेरपी ताण-तणाव कमी करून रक्तप्रवाह व्यवस्थित ठेवते, शरिरात आळस, कंटाळा जाऊन उत्साह येतो, पचनक्रिया, रोगप्रतिकारशक्ती, श्वसनक्रिया, उत्सर्जन क्रिया सुधारते, वजन कमी करता येते, मान, खांदा, हात, तळपाय, गुडघे, पाठ, कंबर, स्नायू, स्वादुपिंड, ह्रदय, किडनी, पित्ताशय अशा विविध अवयायांना या थेरपीचा लाभ होतो. जास्तीत जास्त नागरिकांनी सेवा सप्ताहानिमित्त आयोजित शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी उपमहापौर तथा नगरसेवक तुषार हिंगे व आरंभ फाउंडेशनच्या संचालिका सोनाली तुषार हिंगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *