पिंपरी :- समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) अध्यक्षपदी साहित्यिक कैलास भैरट यांची निवड करण्यात आली आहे. चिंचवडगावातील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम् येथे शनिवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या सभेत सन २०२१ ते २०२३ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे –
कैलास भैरट (अध्यक्ष), सुहास घुमरे (उपाध्यक्ष), मानसी चिटणीस (कार्यवाह), समृद्धी सुर्वे (सहकार्यवाह).
कार्यकारिणी सदस्यपदी उज्ज्वला केळकर, मंगला पाटसकर, जयश्री श्रीखंडे, नीलेश शेंबेकर, सुप्रिया लिमये, पंजाबराव मोंढे, बाळासाहेब सुबंध, रमेश टेकाडे, विनोद चटप, रामचंद्र प्रधान, राजेंद्र भागवत यांची निवड करण्यात आली असून माजी अध्यक्ष शोभा जोशी यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकनीस यांची उपस्थिती होती.