पिंपरी :- पिंपरी चिंचवड नगरीचे माजी उपमहापौर व कामगार नेते केशव घोळवे आणि पिंपरी चिंचवड प्राथमिक शिक्षक परिषद यांच्या अविरत पाठपुराव्यामुळे गेली दोन वर्षे रखडलेला मुख्याध्यापक पदोन्नतीचा प्रश्न निकाली निघाला असून पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षण विभाग आस्थापनेवर कार्यरत 56 शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष- शरद लावंड सर, शहराध्यक्ष- संतोष उपाध्ये सर, पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभापती- नथुराम मादगुडे सर, शिक्षक सहकारी पतसंस्था खजिनदार- पांडुरंग घुगे सर, शिक्षक परिषद सरचिटणीस- मंगेश भोंडवे सर, शिक्षक पतसंस्था मानद सचिव- संतोष गवारे सर, शिक्षक परिषद उपाध्यक्ष व वंजारी सेवा संघ पुणे शहर उपाध्यक्ष- अमोल फुंदे सर, संघटक- राजकुमार जराड सर शिक्षक सहकारी पतसंस्था उपसभापती- धर्मेंद्र भांगे सर आदी यावेळी उपस्थित होते.
यांच्या शिष्टमंडळाने मुख्याध्यापक पदोन्नती, वरिष्ठ निवड श्रेणी लाभ तसेच धनवन्तरी योजना इत्यादी प्रश्न माजी उपमहापौर केशव घोळवे साहेब यांच्यासमोर मांडले असता केशव घोळवे यांनी तातडीने याकामी निवेदन देऊन माननीय आयुक्त- राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त- विकास ढाकणे व उपायुक्त संदीप खोत (शिक्षण विभाग) यांना वरील प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती.
यापैकी मुख्याध्यापक पदोन्नती याप्रश्नी केशव घोळवे व पिंपरी-चिंचवड मनपा शिक्षक परिषद शिष्टमंडळ यांनी गेली अकरा दिवस अथक व अविरत पाठपुरावा केल्यामुळे पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण विभाग आस्थापनेवर गेली दोन वर्षे मुख्याध्यापक विना सुरु असलेल्या 56 मनपा शाळांना आता मुख्याध्यापक मिळाले आहेत काल दिनांक 22 सप्टेंबर 2021 रोजी माननीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त शिक्षण यांनी 56 उपशिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नती आदेश दिले.
याप्रसंगी माननीय बाबासाहेब आव्हाड सर , प्राथमिक शिक्षक परिषद चिटणीस- प्रवीण कुमार शिंदे सर ,संघटक- निलेश गुजर सर जाधववाडी मुले क्रमांक 87 या शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक- सुखदेव वायाळ सर , राष्ट्रपती पारितोषिक विजेते नवनियुक्त मुख्याध्यापक- सुभाष चटणे सर ,संत तुकाराम नगर मुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक- जयंत माळवदे सर ,यशवंत नगर प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ. सुनीता उद्धव राऊत मॅडम ,मुख्याध्यापिका सौ. लवटे मॅडम आदी मान्यवरांनी माजी उपमहापौर व माननीय आयुक्त अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त शिक्षण यांचे पेढे भरून कौतुक केले व आभार मानले. सुभाष चटणे सर यांना सेवानिवृत्ती साठी नऊ दिवस बाकी असताना मुख्याध्यापकपदी प्रमोशन मिळाले याचा सर्वाधिक आनंद झाला असे केशव घोळवे यांनी या प्रसंगी सांगितले.