पिंपरी:- केंद्र, राज्य, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने संयुक्तपणे पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविणेत येत आहे. या प्रकल्पाचे कामकाज प्रगतीपथावर आहे, तरी कामाचा वेग वाढवुन डिसेंबर २०२१ पर्यंत पिंपरी ते वल्लभनगर अशी मेट्रो प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु करा अशा सुचना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मेट्रो प्रकल्प अधिकारी यांना दिल्या. आज पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरी चिंचवड हद्दीतील मेट्रो प्रकल्पाची समक्ष पाहणी करुन मेट्रोची ट्रायल रन घेतली. यावेळी त्यांच्या समवेत उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मेट्रोचे प्रकल्प अधिकारी सोनवणे, पाटील व अग्रवाल उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी महापौर व पदाधिकारी यांनी शहरातील सर्व मेट्रो स्टेशनच्या कामाची व मेट्रो मार्गाच्या कामाची परिस्थिती जाणून घेत पदाधिकारी व मेट्रोचे अधिकारी यांच्या समवेत पुणे पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल रन घेतली. हा मेट्रो प्रकल्प शहरासाठी गौरवाची बाब असुन हा नाविण्यपुर्ण प्रकल्प नागरिकांची उत्सुकता वाढविणारा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे उर्वरीत काम जलदगतीने काम पुर्ण करुन तो डिसेंबर २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवासासाठी सुरु करावा अशा सुचना महापौरांनी अधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा करताना दिल्या. तसेच या मेट्रो प्रकल्पाचे काम पिंपरीच्या पुढे निगडीपर्यंत जलदगतीने सुरु करण्यासाठी काय कार्यवाही सुरु आहे याबाबतही मेट्रो अधिकाऱ्यांकडुन आढावा घेवुन याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना उपस्थित अधिकांऱ्यांना दिल्या. तसेच मेट्रो प्रकल्पाचे नामकरणा संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेने महासभेमध्ये केलेल्या ठरावानुसार या प्रकल्पाचे “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे नामकरण करण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याबाबत देखिल सुचना दिल्या.