पुणे दि.१७-समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे उपस्थित होते.