पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते व विद्यमान नगरसेवक कैलास (बाबा) बारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश
मुंबई :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अपक्ष गटनेते कैलास (बाबा) बारणे यांचा आज राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यलय, मुंबई येथे जाहिर प्रवेश झाला.
तसेच त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष- संजोग वाघेरे (पाटील), विद्यमान नगरसेवक- विठ्ठल उर्फ नाना काटे, संतोष नागुभाऊ बारणे (मा. विरोधी पक्षनेते, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा), अभयशेठ मांढरे (अध्यक्ष- अजित प्रतिष्ठाण ), सतीशदादा दरेकर (राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी, मा. नगरसेवक), ऋषिकेश रेवणनाथ काशिद (अध्यक्ष- कुंभार समाजोन्नती मंडळ, पिं.चिं.शहर जिल्हा, योगेश साळुंखे, प्रविण बारणे, शहाजी लोखंडे, अक्षय बारणे, आणि तुषार मोरे आदी यावेळी उपस्थित होते.