भाजपा ओबीसी मोर्चाकडून महाविकास आघाडीचा निषेध
पिंपरी :- ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. विविध माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून समाजाची केवळ दिशाभूल केली जात आहे. केवळ मतासाठी ओबीसी समाजाचा वापर केला जात आहे. आघाडीच्या या फसव्या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याची टीका भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या संदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आणि ओबीसी विरोधी भूमिकेचा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च्याच्या वतीने निषेध करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार लांडगे बोलत होते.
या वेळी महपौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चा उमा खापरे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, अध्यक्ष ओबीसी आघाडी शहराध्यक्ष ऋषिकेश रासकर,नगरसेवक सागर गवळी,विकास डोळस,सुवर्णा बुर्डे, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे,शर्मिला बाबर,नम्रता लोंढे, प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव,महिला आघाडी अध्यक्षा उज्वला गावडे, वीणा सोनवलकर,कोषाध्यक्ष सचिन तापकीर, शहर उपाध्यक्ष समीर जावळकर,अर्जुन ठाकरे,गणेश ढाकणे,अनिल लोंढे,संकेत चोंधे प्रदीप बेंद्रे, शोभा भराडे, अल्पसंख्याक अध्यक्ष फारूक इनामदार, किसान मोर्चा अध्यक्ष संतोष तापकीर, उद्योग आघाडी अध्यक्ष निखिल काळकुटे,वृक्ष प्राधिकरण सदस्य आनंदा यादव,कैलास सानप,आशा काळे,गीता महेंद्र, दीपक नागरगोजे,राजेश डोंगरे,बाळासाहेब भुम्बे,हिरेन सोनवणे, तेजस्विनी कदम,पूजा आल्हाट,रवी जांभूळकर, सोना गडदे, प्रकाश चौधरी,पंकज शर्मा,शिवराज लांडगे,नंदू भोगले, सविता कर्पे, योगेश लोंढे उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचलन मोरेश्वर शेडगे यांनी केले तर आभार महापौर माई ढोरे यांनी मानले.
आमदार लांडगे म्हणाले की, राज्य सरकारला केवळ निवडणुकीचे पडले आहे. ओबीसी समाजाचा मुद्दा लावून धरून महाविकास आघाडी सत्तेत आली. मात्र सत्ता आल्यानंतर ओबीसी सामजाला आरक्षणाच्या नावाखाली केवळ झुलविले जात आहे. हे आता खपुन घेतले जाणार नाही. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार लांडगे यांनी दिला.
या वेळी ओबीसी के सन्मान मे, भाजपा मैदान मे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही, आदी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
आ.महेश लांडगे, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, उमा खापरे, राजू दुर्गे, वीणा सोनवलकर व ऋषिकेश रासकर यांनी मार्गदर्शन केले.