पिंपरी :- आज पिंपरी चिंचवड शहरात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वात शहरात पुणे मेट्रोच्या विरोधात निर्णयकारक आंदोलन करण्यात आले. आज मेट्रोच्या खांबावर “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे स्टिकर चिटकवण्यात आले. तुम्ही नाव बदल करण्यात चालढकल करत असाल तर आम्हाला कळवा आम्ही ते बदलवून घेऊ, पण खपवून घेणार नाही.

नेहमी कश्या ना कश्या प्रकारे आमच्या शहरावर होणारा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा, त्याला काही मर्यादा असतात. आता या मर्यादा तोडुन आपल्या शहरातील युवक पेटून उठलेला आहे आणि यापुढे अन्याय सहन करणारच नाही तर लढा उभारणार.

प्राधिकरणाचे PCNDTA मध्ये विलनीकरण सुद्धा अशाच अन्यायकारक पद्धतीने करण्यात आले. शहरातील भूमिपुत्रांच्या मोकळ्या जमिनी, भुखंड सगळे PCNDTA मध्ये ओढुन नेले व अतिक्रमित, विकसित झालेले भुखंड आमच्या माथी मारले. किती दिवस हा अन्याय सहन करायचा? काय कारण आहे की आमच्या शहरातील भूमिपुत्रांवर हा सतत अन्याय करत आहात?

पुणे मेट्रो मध्ये आपल्या शहराचा मोलाचा वाटा असुन सुद्धा जर आपल्या शहराला डावललं जात असेल व शहाराच्या अस्मितेवरच घाला होत असेल तर हा अन्याय शहराचे जागरूक नागरिक बनून म्हणून आम्ही तरी सहन करणार नाहीच”, संकेत चोंधे अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर.

आम्ही सर्व पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना सुद्धा आवाहन करतो आहोत की आज आपण आपले अस्तित्व व अस्मितेची लढाई मजबुत करून पिंपरी चिंचवड शहराच्या विरोधकांना दाखवून देऊया की जर विषय शहराचा असेल तर आम्ही मिळून मैदानात उतरू व आमचा हक्क मिळवून घेऊ.

ही तर सुरुवात आहे, जर यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे नाव करण्यात नाही आले तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार.

यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुषार हिंगे, युवा मोर्चा सरचिटणीस जवाहर ढोरे,दिनेश यादव, तेजस्विनी कदम, गणेश जवळकर, उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, अतुल बोराटे, सन्नी बारणे, सुमीत घाटे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *