६महिने विनावेतन काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना कायमस्वरुपी वेतनश्रेणीत नेमणूक मिळवून दिली….
पिंपरी दि. ४ सप्टेंबर २०२१ :- पिंपरी चिंचवड म.न.पा. प्राथमिक शिक्षण विभाग आस्थापनेवर 3 वर्ष शिक्षणसेवक कालावधी पूर्ण केलेल्या व गेली ६ महिने विनावेतन काम करणाऱ्या १५ शिक्षकांना शिक्षण सेवकांना माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्या यशस्वी प्रयत्नातून कायम वेतनश्रेणीत नेमणूक मिळवून देऊन शिक्षकांना ‘शिक्षण दिन’ दिवशी अविस्मरणीय भेट मिळवून दिली आहे. या १५ शिक्षण सेवकांवरील गेली ६ महिने होणारा अन्याय शिक्षक दिना दिवशी दूर करण्यात श्री केशव घोळवे, महाराष्ट्र राज्य प्रा. शिक्षक परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष श्री. संतोष उपाध्ये, श्री नथुराम मादगुडे सभापती पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षक संस्था, श्री. घुगे पांडुरंगसर, श्री अमोल फुंदेसर यांच्या प्रयत्नांना यश आले. यावेळी शिक्षण विभाग पर्यवेक्षक रामदास लेंबे, उपसभापती धमेंद्र भांगे, राजकुमार जराड सर शिक्षक परिषद संघटक आदी यावेळी उपस्थित होते.
सदर प्रश्नी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने माजी उपमहापौर श्री केशव घोळवे यांची भेट घेऊन १५ शिक्षण सेवकांना कायम करण्याची मागणी केली. वरील प्रश्नी तातडीने पावले उचलत श्री घोळवे यांनी मा आयुक्त राजेश पाटील, अति. आयुक्त श्री विकास ढाकणे, मा उपायुक्त खोत साहेब यांना सदर प्रश्नी लेखी निवेदन देऊन ५ सप्टेंबर २०२१ च्या आधी हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. मा. श्री. केशव घोळवे यांच्या अविरत पाठपुराव्यामुळे प्राथमिक शिक्षण सेवकांच्या नियमित वेतनश्रेणीत नेमणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.