पिंपरी :- गेल्या दोन वर्षांपासून आपल्यासह सबंध देशावर कोरोनाचे सावट आहे त्यातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काही महिन्याच्या कालावधीवर येऊन ठेपल्या असताना बऱ्याच तरुणांची १८ वर्षे वय पुर्ण झालेल्यांची मतदार नोंदणी झालेली नाही त्याची दखल घेत प्रभाग क्र ३० येथील ज्या नागरिकांची नोंदणी झाली नाही त्यांना नावनोंदणी घरीच राहून सहज व सोप्या पद्धतीने करता यावी यादृष्टीने पिंपरी विधानसभा युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने QR कोड व लिंक सुरू करण्यात आली.. त्या QR कोड द्वारे नागरिक आपला मतदान फॉर्म घरीच बसून ऑनलाईन भरू शकतात.. तसेच सर्व दस्तऐवज घरातूनच अपलोड करू शकतात.. म्हणजेच घरी बसूनच आपल्या प्रभागात आपले नाव लागू शकते.. अशी एक अगळी वेगळी संकल्पना श्री निलेश हाके यांनी राबवली आहे .. त्या QR कोड व लिंक चे प्रकाशन मावळचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे, जिल्हा संघटिका सौ. सुलभाताई उबाळे, शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, मा. गटनेते राहुल कलाटे, पिंपरी चिंचवड युवासेना शहर प्रमुख विश्वजित बारणे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ह्यावेळेस पिंपरी युवासेना सन्मवयक रवी नगरकर, अविनाश जाधव, रामभाऊ शिंगोटे, टॉनी मकासारे, उपस्थित होते.

खालील लिंक चा वापर करून ही आपण आपला नवीन मतदार नाव नोंदणी करू शकता.
https://docs.google.com/forms/d/1yfy6-gjyRteLpiLo-JfgZAt4nmUAlqOqh13rJ5xRzww/edit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *