पिंपरी चिंचवड । दि. 11 ऑगस्ट :- अर्जुनवीर काका पवार यांनी आपल्या तालमीत गेल्या १६ वर्षा पासून अनेक नामांकित जागतिक दर्जाचे मल्ल तयार केले, आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरीमधील व्यापारी साजिद शेख यांनी वेताळ शेवाळे या मल्लाची रशिया येथे होणारी जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन साठी निवड झाली त्यास आर्थिक मदत म्हणून ५१ हजार व ज्या तालमीत तो प्रशिक्षण घेत होता त्या तालमीला भविष्यात असे जागतिक दर्जाचे खेळाडू घडवावेत म्हणून १ लाख ची मदत सुमित स्पोर्ट्स यांच्या तर्फे करण्यात आली. या वेळी आमदार बनसोडे देखील उपस्थित होते . देशातील आघाडीच्या खेळाडूंना खाजगी संस्था नागरिक मदत करतात याचे कौतुक आहेच पण सरकारने देखील मदतीचा हात द्यावा अशी खंत अर्जुनवीर काका पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलतांना पवार म्हणाले की ऑलिम्पिक च्या निमिताने खेळाडूंची वाहवा केली जात आहे , मात्र एकदा हे वातावरण शांत झाले की खेळाडूंकडे कोणी पहात नाही , खेळाच्या सरावासाठी मोठमोठी क्रीडा संकुल उभारण्यात आले आहेत परंतु नियोजनाअभावी क्रीडा संकुलात खेळाडूंना सराव करता येत नाही त्यामुळे दर्जेदार खेळाडू तयार होत नाही.
यावेळी बोलतांना आमदार बनसोडे म्हणाले की , समाजात जो पर्यंत दानशूर व्यक्ती आहेत तो पर्यंत खेळाडूंच्या सरावात कमी पडणार नाही , काका पवार यांच्या तालमीतील मल्लांनी वेळोवेळी कुस्तीची मैदाने गाजवली आहेत.