पिंपरी / दि. १० ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड मधील गांधीनगर व खराळवाडी झोपडपट्टी भागातील अनेक गरीब कुटुंबाकडे शिधापत्रिका नसल्या मुळे तसेच अनेक कुटुंबाचे रेशन कार्ड बंद झाल्यामुळे, अनेक शिधा पत्रिका दुकानांना जोडल्या नसल्यामुळे , नागरिकांना शासनाच्या मोफत रेशन चा लाभ घेता येत नाही, तसेच शासनाच्या अनेक सुविधा पासून वंचित रहावे लागते, या भागात हातावर पोट असणारे, तसेच रोजंदारी वर काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, व सध्या कोविड काळात अनेकांच्या नोकऱ्या व हातातले काम गेले आहे, नागरिक वाढत्या महागाई ने त्रस्त आहेत, किमान रेशन वरील धान्य मिळेल तसेच शासकीय योजना चा लाभ मिळावा यासाठी या येथील नागरिकांनी फॉर्म भरून दिले आहेत परंतु त्यांना अजून शिधापत्रिका भेटली नाही, व समस्यांचे निवारण झाले नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भांडेकर यांनी आमदार बनसोडे यांना दिली.
आमदार बनसोडे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनाशी बोलून फॉर्म भरलेल्या सर्व नागरिकांना चिंचवड येथे रेशन कार्ड वाटप करण्याचे आदेश दिले यावेळी परिमंडळ अधिकारी व त्याचे सहकारी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांकडून शिधापत्रिकेच फॉर्म भरून घेण्यात आले आले, व लवकरात लवकर त्यांना शिधापत्रिका मिळाव्यात यासाठी आमदार बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या, नागरिकांना शिधा पत्रिका मिळणेबाबत पांडुरंग भांडेकर यांच्या सोबत सतीश भांडेकर ,ऍड बी.के. कांबळे, बाबू म्हेत्रे, प्रवीण कांबळे, रमा लक्ष्मण गायकवाड, राजू बनपट्टे, यांनी सहकार्य केले.