भोसरी कला, क्रीडा मंचचा उपक्रम : सफाई कर्मचारी, कलाकारांना मदतीचा हात

पिंपरी । प्रतिनिधी :- गुरू आणि मार्गदर्शक असणाऱ्या माजी आमदार व शहराचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांच्या समाजकार्याचा वसा ॲड. नितीन लांडगे यांनी अतिशय प्रभावीपणे पुढे चालवला आहे. कलाकार आणि सफाई कर्मचाऱ्यांना मदत, पाच लाखांचा विमा, किराणा किट व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत करणाऱ्या नितीन लांडगे यांचा सर्व लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा. कारण राजकारण आणि समाजकारणाची सांगड घालत नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होतो तोच खरा लोकप्रतिनिधी असतो, असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी भोसरी येथे केले.

भोसरी कला, क्रीडा रंगमंचच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते शहरातील कलाकार, सहायक कलाकार, तंत्रज्ञ यांना किराणा किट आणि वीमा पॉलिसीचे तर सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. दिघी रोड येथील गणेश मंदिराजवळ मंगळवारी (दि.२७) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा शहर सरचिटणीस विजय फुगे, राजशेखर डोळस, निवृत्ती फुगे, प्रा. सतिश फुगे, प्रकाश डोळस, राजेश टाकळकर, निवृत्ती लांडगे, नंदू लोंढे, संजय पटणी, विजय उलपे, शारदा मुंडे, मृणाल कुलकर्णी, साधना मेश्राम, पी. चंद्रा, गोविंद गाडे, चंद्रकांत नगरकर, महंमद रफी शेख आदींसह शहरातील कलाकार तसेच सफाई कामगार उपस्थित होते. प्रास्ताविक विजय फुगे, सुत्रसंचालन प्रकाश डोळस आणि आभार राजशेखर डोळस यांनी मानले.
आमदार लांडगे म्हणाले की, गेल्या चौदा वर्षांपासून भोसरी कला, क्रीडा मंचच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना, खेळाडूंना व्यासपिठ आणि संधी मिळवून देण्यासाठी ॲड. नितीन लांडगे आणि त्याचे सहकारी सतत प्रयत्नशील असतात. गणेशोत्सव काळात यासाठी महोत्सव आयोजित केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कलाकारांच्या हाताला काम नसल्याने हतबल झाले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीचा विचार करून ॲड. लांडगे त्यांच्या मदतीसाठी सरसावले हे नक्कीच कौतुक आणि अभिमानास्पद आहे. ते करत असलेले काम प्रेरणादायी असून लोकप्रतिनिधींनी त्यांचा आदर्श घ्यावा. प्रत्येकाने समाजासाठी खारीचा वाटा उचलणे आवश्यक असल्याचे लांडगे यांनी सांगितले. यावेळी शारदा मुंडे, विजय उलपे, मृणाल कुलकर्णी, प्रा. सतिश फुगे यांनीही मनोगत व्यक्त केले.

मदत नव्हे कर्तव्य !
कोरोना काळात सर्वच समाज घटकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत चिपळूण, रत्नागिरी येथिल पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गरजू कुटूंबांना मदत करण्यासाठी ठराव पास केला होता. परंतू शासकीय उदासिनतेमुळे ते शक्य झाले नाही. आम्ही भोसरी कला, क्रीडा मंचच्या माध्यमातून शक्य तेवढी मदत करण्याचे काम करीत आहोत. आगामी काळातही मदतीसाठी आणखी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करु आणि हि फक्त मदत नाही तर आमचे कर्तव्य आहे असे मत ॲड. लांडगे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *