पिंपरी:- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून अ प्रभागाच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ.  शर्मिलाताई राजेंद्र बाबर व पतंजली योग समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने निगडीतील दुर्गादेवी टेकडीवर आयोजित योग, प्राणायाम शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चार दिवसात सहाशेहून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

 कोरोना संकटाच्या काळात सदृढ आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आरोग्य, प्रकृतीबाबत नागरिक आणखी सजग झाले आहेत. उत्तम आरोग्य राखण्यासाठी योग, प्राणायाम हे महत्त्वाचे साधन आहे. या उद्देशाने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून 21 जून ते 24 जून 2021 या दरम्यान चार दिवसांचे हे योग, प्राणायाम शिबीर पार पाडले. हे चार दिवस दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेत योग प्रशिक्षिकांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.

 शिबिरात योग प्रशिक्षक अतुल कटारे, हिरामण भुजबळ, विनोद आर्य यांनी योग, प्राणायाम, ध्यानाचे प्रात्याक्षिके दाखवली. तसेच, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, मानसिक सामर्थ्य वाढवणे, सकारात्मक उर्जा तयार करणे यासह योगाविषयी संपूर्ण मार्गदर्शन केले. शिबिरात चार दिवसात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सहाशेहून अधिक जणांनी उत्सूफर्त सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *